Chardham Yatra
चारधाम यात्रा ही भारताच्या उत्तराखंड राज्यातील चार पवित्र हिंदू धार्मिक स्थळांसाठी ओळखली जाते. ती स्थाने यमुनोत्री, गंगोत्री , बद्रीनाथ व केदारनाथ ही आहेत. हिमालयाच्या कुशीत वसलेली उत्तर भारतातील ही स्थाने धार्मिक गतिविधींचे केंद्र आहेत. परंपरेनुसार चारधाम यात्रा , पश्चिमेकडून पूर्वेकडे केली जाते. यानुसार ही यात्रा यमुनोत्री येथे सुरु होऊन अनुक्रमे गंगोत्री व शेवटी केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे समाप्त होते आणि या चार पवित्र तीर्थक्षेत्रांना चार धाम यात्रा म्हणतात. ही यात्रा जगभरातील अनेक यात्रेकरूंनी केली आहे. देवतांची महानता आणि महान हिमालयाच्या नैसर्गिक सौंदर्याची ही एक आदर्श संकल्पना आहे. ज्यामुळे चारधाम यात्रेच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रेमात वाढ होते.