Pithapur Kuravpur Yatra
श्री क्षेत्र कुरवपूर आणि श्री क्षेत्र पिठापूर ही श्रीदत्तत्रेयांचेअवतार श्रीपादश्रीवल्लभ यांच्या अवतारांशी निगडीत दैवी अनुभूती करुन देणारी दत्त क्षेत्र आहेत. श्रीपादश्रीवल्लभांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पिठापूर येथे झाला आणि त्यांच्या लीला आणि अवतार समाप्ती कुरवपूर याठिकाणी झाली. वयाची सोळा वर्षे झाल्यानंतर ते पिठापूर येथून निघाले आणि संपूर्ण भारतभ्रमण करुन ते कुरवपूर याठिकाणी आले.