Chardham Yatra
चारधाम यात्रा
चारधाम यात्रा ही भारताच्या उत्तराखंड राज्यातील चार पवित्र हिंदू धार्मिक स्थळांसाठी ओळखली जाते. ती स्थाने यमुनोत्री, गंगोत्री , बद्रीनाथ व केदारनाथ ही आहेत. हिमालयाच्या कुशीत वसलेली उत्तर भारतातील ही स्थाने धार्मिक गतिविधींचे केंद्र आहेत. परंपरेनुसार चारधाम यात्रा , पश्चिमेकडून पूर्वेकडे केली जाते. यानुसार ही यात्रा यमुनोत्री येथे सुरु होऊन अनुक्रमे गंगोत्री व शेवटी केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे समाप्त होते आणि या चार पवित्र तीर्थक्षेत्रांना चार धाम यात्रा म्हणतात. ही यात्रा जगभरातील अनेक यात्रेकरूंनी केली आहे. देवतांची महानता आणि महान हिमालयाच्या नैसर्गिक सौंदर्याची ही एक आदर्श संकल्पना आहे. ज्यामुळे चारधाम यात्रेच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रेमात वाढ होते.
कृपया चारधाम यात्रेच्या चार पवित्र स्थळींचे खालील वर्णन:
यमुनोत्री: यमुना नदीच्या सर्वात जवळचे तीर्थक्षेत्र, यमुना नदीच्या स्त्रोताजवळ असलेल्या चारधाम यात्रेमध्ये सर्वात जवळील मंदिर आहे. टिहरी गढवालच्या महाराजा प्रताप शाह यांनी बांधलेली यमुनेरी मंदिर यमुना नदीच्या डाव्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
गंगोत्री: गंगोत्री धाम सागरी स्तरांवरून 3200 मीटर उंचीवर असलेल्या भागीरथी नदीच्या काठावर असून हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थस्थळ म्हणून मानले जातात. चारधाम यात्रेमध्ये गंगोत्रीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. गौमुख ग्लेशियर, गंगा नदीचा स्रोत म्हणून ओळखला जातो. गंगोत्री पासून ट्रेक मार्गावर स्थित आहे. गौमुख ग्लेशियरला भेट देणाऱ्या पर्यटकांना सरकारी परवानगीची आवश्यकता आहे.
केदारनाथ: केदारनाथ मंदिर हिंदू धर्मातील अनुयायींसाठी सर्वात पूजलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. भगवान शिवांच्या बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून 3585 मीटर उंचीवर मंदाकिनी नदीच्या उगमाजवळ स्थित आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी गौरीकुंडवरून 14 कि.मी. चा ट्रेक मार्ग आहे. तथापि, फाट्यापासून सुरू होणा-या एका हेलिकॉप्टरच्या शेजारीदेखील ह्या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो.
बद्रीनाथ: बद्रीनाथ हे चारधाम मधील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक लोकप्रिय धाम आहे. ज्याला बद्रीविशालही म्हणतात. बद्रीनाथ हे क्षेत्र भारतातील आद्यगुरु शंकराचार्य यांनी स्थापित केले.
Day 1 – (पुणे- दिल्ली – हरिद्वार (२३० किमी/६ तास ) )
- पुण्यावरून/ मुंबईवरून दिल्लीकडे विमानाने प्रस्थान.
- दिल्ली येथे पोहोचणे.
- दिल्ली येथून हरिद्वार कडे प्रस्थान.
- हरिद्वार येथे पोहोचणे.
- संध्याकाळी हर-की-पावरी येथे गंगा आरती साठी जाणे.
- हॉटेलवर परतणे. जेवण व मुक्काम करणे.
Day 2 – हरिद्वार – बारकोट (२४०किमी / ७ तास )
- नाष्टा आटोपून बारकोट कडे प्रस्थान.
- संध्याकाळी बारकोट येथे पोहोचणे व हॉटेल मध्ये check -in करणे व मुक्काम.
Day 3 – बारकोट – रणचट्टी -यमुनोत्री – बारकोट (१५ किमी बस ने आणि ६ किमी ट्रेक (एका बाजूने) )
- फुलचट्टी पर्यंत बस प्रवास व तिथून पुढे यमुनोत्री कडे प्रवास.
- यमुनोत्री कडे आपण पायी , घोड्याच्या साहाय्याने किंवा डोली च्या साहाय्याने प्रवास करू शकता. (स्वखर्चाने) अंदाजे अंतर ७ ते ८ किमी.
- आपण या ठिकाणी कपड्यामध्ये तांदूळ बांधून आणून ते गरम पाण्याच्या कुंडात बुडवून , तो शिजलेला भात घरी प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकता.
- यमुनाबाई येथे गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून यमुनाजीचे दर्शन व दिव्यशीला येथे पूजा करणे. हनुमानचट्टी येथे परतणे.
- बारकोट कडे बसने प्रस्थान व बारकोट येथे मुक्काम.
Day 4 – बारकोट-उत्तरकाशी (१३० किमी / ४ तास)
- सकाळी नाष्टा करून उत्तरकाशी येथे विश्वनाथ मंदिराचे दर्शन करणे.
- उत्तरकाशी येथे मुक्काम.
Day 5 – उत्तरकाशी – गंगोत्री-उत्तरकाशी (१०० किमी /३ तास जायला – ३ तास यायला)
- उत्तरकाशी येथून गंगोत्रीकडे प्रस्थान
- वाटेत अलीगाव, भागीरथी नदी व हिमालय पर्वतांचे मनमोहक दृश्य पाहणे.
- गंगोत्री दर्शन करून उत्तरकाशीला परतणे व मुक्काम.
Day 6 – उत्तरकाशी-सीतापुर (२३० किमी / ८ तास )
- सकाळी सितापूर कडे प्रस्थान.
- सितापूर येथे मुक्काम.
Day 7 – केदारनाथ (१४ किमी ट्रेक )
- सकाळी बसने गौरीकुंड येथे पोहोचणे.
- गौरीकुंड येथून पायी अथवा डोलीने प्रवास (स्वखर्चाने डोली )
- या ठिकाणी आपण हेलीकॉप्टर ने देखील जाऊ शकता, परंतु हेलीकॉप्टर चे तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते, तरीही आम्ही तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
- परंतु कधी कधी पाऊस किंवा ढगाळ वातावरणामुळे अचानक हेलीकॉप्टर रद्द सुद्धा होतात, अश्यावेळी आपल्याला घोड्याने अथवा डोलीने प्रवास करावा लागतो. हेलीकॉप्टर चा रिफंड देखील त्वरित होत नाही, त्यासाठी ३ ते ६ महिने वाट पहावी लागते.
- आम्ही कोणत्याही प्रकारे हेलीकॉप्टर चे तिकीट मिळेलच याची शाश्वती देत नाही.
- प्रवाश्यांनी आपले नियमित औषधे सोबत घेणे आवश्यक .
- केदारनाथ मंदिराचे दर्शन.
- सितापूर येथे रात्रीचा मुक्काम.
Day 8 – केदारनाथ
- जे भक्त पायी केदारनाथ वर गेले आहेत ते केदारनाथ वर मुक्काम करतात (स्वखर्चाने)
- त्यांच्या खाली येण्यासाठी हा दिवस देखील आपण केदारनाथ साठी राखीव ठेवलेला असतो.
- सितापूर येथे मुक्काम.
Day 9 – केदारनाथ ते बद्रीनाथ (१५० किमी / ८ तास )
- जोशीमठ मार्गे बद्रीनाथ कडे प्रस्थान.
- बद्रीनाथ येथून साधारण ३ किमी अंतरावर माना गाव , व्यास गुफा, मातामूर्ती, चरणपादुका , भीमकुंड आणि सरस्वती नदीचे मुख यांसारखी अनेक महत्वपूर्ण ठिकाणे आहेत.
- संध्याकाळी बद्रीनाथ येथे मंदिरात आरती साठी उपस्थित राहणे.
- बद्रीनाथ येथे मुक्काम.
Day 10 – बद्रीनाथ ते श्रीनगर : (१६५ किमी/७ तास)
- पहाटे तप्तकुंडात स्नान करून बद्रीविशालचे दर्शन घेणे.
- ब्रह्मकमळ हि जागा पिंडदान श्राद्ध (पूर्वजांचे ) यासाठी आहे.
- श्रीनगर येथे मुक्काम.
Day 11 – श्रीनगर ते ऋषिकेश – ऋषिकेश ते हरिद्वार (१३० किमी / ४ तास)
- ऋषिकेश येथे राम झुला, लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट, परमार्थ निकेतन, शिवानंद आणि गीता कुटीर पाहणे.
- दुपारच्या जेवणानंतर हरिद्वार येथे जाणे.
- हरिद्वार येथे मुक्काम
Day 12 – हरिद्वार ते दिल्ली/मुंबई/पुणे (२३० किमी /६ तास) विमानाने प्रवास
- दिल्ली येथे पोहोचणे व दिल्ली येथून पुण्याकडे/मुंबईकडे प्रस्थान (विमानाने प्रवास)
यात्रा समाप्त !
Included
- पुणे ते पुणे अथवा मुंबई ते मुंबई विमानप्रवास
- दिल्ली ते दिल्ली बस प्रवास
- सकाळी चहा, नाष्टा ,रात्रीचे जेवण
- राहण्याची सुविधा(२/३/४ शेअरिंग बेसिस वर हॉटेल मध्ये, ज्या प्रमाणे आपला ग्रुप असेल त्याप्रमाणे)
Excluded
- टीप, प्रवास विमा, वैद्यकीय विमा, लाँड्री शुल्क,टेलिफोन चार्जेस आणि दैनंदिन वापराच्या गोष्टी.
- डोली, घोडा, हेलीकॉप्टर ,केबल कार, इत्यादी शुल्क.
- दुपारचे जेवण
काही नियम व अटी
- या यात्रेमध्ये स्त्री व पुरुष दोघांनाही मुक्त प्रवेश आहे .
- आपले ओळखपत्र हे स्वतःसोबत ठेवणे बंधनकारक आहे .
- संपुर्ण प्रवासात फक्त शाकाहारीच जेवण दिले जाईल .
- यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ” या तत्वावर प्रवेश दिला जाईल .
- यात्रेचे बुकिंग करतेवेळी स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
- आपण बुकिंग दरम्यान फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल . आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी १२,००० रक्कम भरणे आवश्यक आहे. तसेच उर्वरित रक्कम यात्रेला जाण्याच्या ३० दिवस आधी भरावी लागेल . उर्वरित रक्कम दिलेल्या अवधीत जमा न केल्यास बुकिंग रद्द करण्याचे अधिकार संस्थेला असतील .
- हि रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता .
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून त्यांना यात्रेला येण्यास शक्य होणार नसल्यास बुकिंग करतेवेळी भरलेली रक्कम यात्रेकरूंना माघारी मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
- बहुतांश ठिकाणी अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअर सारख्या सुविधा उपलब्ध असतीलच असे नाही , त्यामुळे अशा ठिकाणी प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा असेल.
- ट्रीपला जाण्याच्या ठिकाणी नैसर्गिक स्थिती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संस्थेला असतील. तारखांमध्ये बदल करण्यात येणार असेल तर त्याची माहिती १५ दिवस आधी प्रवाशांना देण्यात येईल , त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा असेल.
- जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्याच्या संबंधित सर्व प्रकारचे औषध जवळ बाळगणे आवश्यक आहे.
- प्रवाश्यांचे कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, मित्र, आप्तजन,स्वकिय अथवा ओळखीचे व्यक्ती ; जे आमच्या संस्थेमार्फत ट्रिप ला आलेले नाहीत, अश्या कुठल्याही व्यक्तीला रूम्स , रेस्टोरंटस किंवा साईट सिनिंग मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अश्या प्रकारे काही आढळ्यास प्रवाश्याना दंड करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत.
- प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे धूम्रपान तसेच नशा करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळ्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार संस्थेला आहेत.
- संपूर्ण प्रवासात आपले सामान आपल्यालाच वाहून न्यावे लागेल, त्यामुळे कमीत कमी सामान घ्यावे. प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास संस्था त्याला जबाबदार राहणार नाही.
- प्रवासादरम्यान तसेच संपूर्ण यात्रेमध्ये आम्ही नियोजित केलेल्या सहलीचे फ़ोटो व व्हिडिओ , संस्था आठवणी साठी संग्रहित करून ठेवते तसेच संस्थेच्या ट्रिपविषयी प्रचार व प्रसारासाठी वापरू शकते. या बद्दल प्रवाशांना काही आक्षेप असल्यास त्याची तशी पूर्व कल्पना आम्हाला देणे.
- प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा वैयक्तिक सल्ला असेल.
- यात्रेदरम्यान गैरसोयी अधिक प्रमाणावर व्हायची शक्यता आहे. कारण तेथील परिस्थिती हि सतत बदलत असते. तिच्यावर नियंत्रण करणे खूप अवघड आहे, त्यामुळे, आम्ही एवढे शुल्क भरले , आता आम्हाला सर्व सोयी सुविधा वेळच्या वेळी मिळायलाच हव्यात आणि भरलेल्या पैशांची वसुली झालीच पाहिजे , अशा प्रकारचा दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींनी कृपया या यात्रेत सहभागी होऊ नये हि विनंती.
- आपल्याला यात्रेसंबंधी ज्या काही सूचना करायच्या असतील त्या यात्रा संपल्यावर लेखी स्वरूपात कराव्यात. तेथील पवित्र आणि मंगल परिसरात आयोजक आणि इतर कोणाबरोबर कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये.
- यात्रेमध्ये संस्थेने तयार केलेले नियम व शिस्त पाळणे बंधनकारक असेल.
- प्रवासादरम्यान संस्थेने नेमून दिलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरूंनी पाळणे बंधनकारक असेल.
- गैरसोय हीच मुख्य सोय असण्याची शक्यता आहे , असे खात्रीपूर्वक समजून व उमजून या सर्वांशी सामना करायची मानसिक आणि शारीरिक क्षमता असनाऱ्या व्यक्तींनीच यात्रेमध्ये सहभागी व्हावे हि विनंती.
महत्वाच्या सूचना
- आपण सर्वजण चारधाम यात्रेला जात आहोत. देवाची इच्छा असल्याशिवाय त्यांचे दर्शन करणे शक्य नसते. आपण सर्व जण नशीबवान आहोत म्हणून आपल्या सर्वाना दर्शनाचा लाभ होणार आहे.
- देवदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, महाराज पावलोपावली आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे देवदर्शन करतेवेळी आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे.
- श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स अंतर्गत आमची हि १६ वी चारधाम यात्रा आहे. आजपर्यंत ८०० भक्तांना या यात्रांमधून दर्शनाचा लाभ झाला आहे.
- चारधाम यात्रा थोडीसी अवघड आहे,त्यामुळे आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे.
- सर्वानी प्रवासाच्या २ तास अगोदर विमानतळावर हजर असणे आवश्यक आहे.
- विमानामध्ये हवेचा दबाव कमी झाल्यामुळे कानाला दडे बसू शकतात, त्यामुळे कानात कापसाचे बोळे घालावे.
- यमुनोत्रीला ६ किमी वर जावे लागते ,तिथे आपली गाडी जात नाही तिथे आपल्याला डोलीने अथवा घोड्याने जावे लागते. घोड्याला साधारण १५०० रुपये तर डोलीला साधारण ४५०० रुपये खर्च येऊ शकतो.
- केदारनाथला १४ किमी प्रवास हा पायी,डोलीने ,घोड्याने अथवा हेलिकॉप्टर ने करावा लागतो. घोड्याला साधारण ४५०० ,डोलीला साधारण ८५०० तर हेलिकॉप्टर ला साधारण ९५०० रुपये खर्च येतो. ढगाळ वातावरण असल्यास हेलिकॉप्टर उड्डाण करत नाही.
- चारधाम यात्रेत ATM ची संख्या खूप कमी आहे त्यामुळे शक्यतो कॅश सोबत बाळगावे.
- आपण ज्या ठिकाणी जात आहोत ती अतिशय छोटी खेडेगाव आहेत. तिथे शहरांसारख्या सुखसोयी लवकर उपलब्ध होत नाहीत. भक्तांना कोणताही त्रास होऊ नये ह्याची जबाबदारी महाराजांनी आमच्यावर सोपवली आहे, त्यानुसार त्या लहानश्या खेड्यांमध्येही सुखसोयी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आम्ही करतो. परंतु तरीही अचानक काही अडचणी आपल्या कडून सहकार्याची अपेक्षा असेल.
- आपण जाणार असलेल्या ठिकाणी गरम पाणी,कमोड व बेड ची व्यवस्था केलेली आहे, परंतु काही वेळा चुलीची लाकडे संपली, लाईट गेली असल्यास गरम पाणी उपलब्ध करणे शक्य होत नाही. अशा अडचणी सहसा येत नाहीत परंतु आल्या तरी त्यावेळी तिथे सामंजस्याने वागावे.
- यात्रेमध्ये आपल्याला दररोज पहाटे उठावे लागते.
- विमानतळावर वर आपले सामान आपल्यालाच वाहून न्यावे लागेल त्यानुसार सर्वानी आपल्याला झेपेल एवढेच सामान आणावे. त्यामुळे शक्यतो चाकांची बॅग असावी म्हणजे आपल्याला सामान वाहून न्यायला त्रास होणार नाही.
- आमचे स्वयंसेवक हे आपल्यापेक्षा वयाने खुप लहान आहेत परंतु या यात्रांचा अनुभव त्यांना जास्त आहे त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूंनी स्वयंसेवकांच्या सूचना पाळणे व सांगितलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपल्याला काहीही गैरसोय होत असल्यास तसे आपण स्वयंसेवकास सांगू शकता, त्याप्रमाणे आपल्याला मदत केली जाईल . यात्रेमध्ये कोणीही स्वयंसेवकांशी चढ्या आवाजात बोलणे, त्यांच्याशी भांडणे करणे असा व्यवहार करू नये. यात्रेमध्ये कोणीही आपापसात देखील भांडू नये.
- साईट सीइंग च्या वेळी वाहनांमध्ये आळीपाळीने पुढे मागे बसावे. कोणाचीही जागा निश्चित स्वरूपाची नाही. हे सर्वानी आपापसात सामंज्यसाने ठरवावे.
- आमच्या संस्थेमार्फत आपल्याला पाठीवरची सॅक व डोक्यावरची कॅप भेट म्हणून दिली जाते. ज्यामध्ये आपण पाण्याची बाटली , नियमित गोळ्या, मेकअप चे सामान , चष्मा, हातरुमाल, पैसे अश्या वस्तू ठेऊ शकता. संपूर्ण यात्रेदरम्यान आपल्याला डोक्यावर टोपी घालणे आवश्यक असते.
- आपणास कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे परंतु तरीही परिस्थिती नुसार कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता असते, त्यावेळी कोणी तक्रार करू नये.
- यात्रेसाठी काय सामान आणायचे, याबद्दल सर्व माहिती आपल्याला यात्रेला जाण्याच्या १५ दिवस आधी दिली जाते.
- ऐनवेळी महामारी,वादळ,पर्जन्यवृष्टी,पूर,भारतबंद,अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणाने यात्रा रद्द झाल्यास कोणत्याही परीस्थित आपण भरलेली आगाऊ रक्कम आपल्याला परत मिळणार नाही, तसेच अशावेळी विमान तिकीट रद्द करावे लागल्यास जे काही कॅन्सिलेशन शुल्क आहे ते आपल्या यात्रा शुल्कातून कापून घेतले जाईल व उर्वरित रक्कम पुढील यात्रेसाठी ग्राह्य धरली जाईल. अशावेळी आपण त्यानंतर यात्रा आयोजित केल्यावर त्यामध्ये सामील होऊ शकता.