Uttarvahini Narmada Parikrama
चैत्रीय उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा
(संपूर्ण नर्मदा परिक्रमेइतकीच पुण्यदायी)
नर्मदा परिक्रमा हे प्रत्येक भाविकाचे स्वप्न आहे. नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही आपण रोमांचित होतो. अशावेळी तीचा प्रत्यक्ष सहवास घडविणारी ही परिक्रमा आपल्या जीवनाला जणू एका अदभुत अनुभूतीचा परीस स्पर्श करुन जाईल.
गरूडेश्र्वरजवळ गुजरात राज्यात बडोदाजवळील धनेश्वर ते रेंगण व रेंगण ते रामपुरा अशी नर्मदा नदी उत्तर वाहिनी आहे. म्हणजे ती उत्तर दिशेने वाहते. कोणत्याही नदीने उत्तर दिशेने वाहणे हे अत्यंत पुण्यदायी समजले जाते. वाराणसी (काशी) येथे गंगा नदी वरूण घाटापासून अस्सी घाटापर्यंत उत्तर वाहिनी आहे. म्हणूनच काशी अत्यंत पुण्यदायी आहे. नर्मदापुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये बळी राजाची एक कथा आहे त्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये जर “उत्तर वाहिनी” नर्मदा परिक्रमा केली तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, अशी साक्षात नर्मदामैय्याने खात्री दिली आहे.
तीन वर्ष तीन महिन्यांमध्ये किंवा सहा महिन्यामध्ये संपूर्ण पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणे प्रत्येकाला सहज शक्य नसते. त्या सर्वांसाठी चैत्र महिन्यातली एक दिवसांची उत्तर वाहिनी नर्मदा परीक्रमा ही एक अनोखी पर्वणी आहे.
परिक्रमेबरोबरच १) गरुडेश्र्वर २) तिलकवाडा ३) कुबेर भंडारी ४) नारेश्र्वर यांचेही दर्शन घेता येईल. ही परिक्रमा ज्यांना चालत करता येणार नाही ते अधिक शुल्क देवून रिक्षा वाहनातूनही परिक्रमा पूर्ण करू शकतात.
अध्यात्मिक आणि धार्मिक यात्रा परिक्रमा या ६० वर्षे वयानंतर करण्याच्या गोष्टी नसून तरूणपणीच त्यांचा आनंद घेतला तर आपल्या जीवनाला, आपल्या विचारांना एक नविन दिशा मिळते. त्यामुळे भाविकांनी विशेषतः तरुणांनी आणि नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी वेळात वेळ काढून उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेची दिव्य अनुभूती घ्यावी ही विनंती.
स्थलदर्शन
- गरुडेश्र्वर
- कुबेर भंडारी
- नारेश्र्वर
- भालोद दत्त मंदिर
- Statue of unity
Day 1
- पुणे / मुंबई येथून भरूच कडे प्रस्थान.
- भरूच येथे पोहोचणे व नारेश्वर मुक्काम.
Day 2
- नारेश्वर दर्शन, कुबेर भंडारी दर्शन , गरुडेश्वर दर्शन व तिलकवाडा येथे मुक्काम.
Day 3
- पहाटे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा प्रारंभ.
- परीक्रमेसाठी साधारण १८ किमी पायी चालावे लागेल.
- ज्यांना पायी चालणे जमणार नसेल त्यांच्यासाठी रिक्षाने सुद्धा व्यवस्था करण्यात येयील. (रिक्षाचा खर्च हा वैयक्तिक असेल.)
- तिलकवाडा येथे मुक्काम.
Day 4
- भालोद दर्शन.
- संध्याकाळी मुंबई/पुणे कडे प्रस्थान.
Day 5
- सकाळी पुणे/मुंबई येथे पोहोचणे.
Included
- सर्व प्रवास खर्च – AC Railway Tickets, AC बस
- दररोज दोन पाण्याची बाटली
- दोन वेळचा चहा
- सकाळी नाष्टा
- दोन वेळचे जेवण
- राहण्याची सुविधा हॉटेल मध्ये (२/३ शेअरिंग बेसिस वर)
- Statue of unity तिकीट
Excluded
- रेल्वेतील चहा, नाष्टा, जेवन, पाणी
- रिक्षाने परिक्रमा करणार असल्यास रिक्षाभाडे
नर्मदा परिक्रमेविषयी माहिती
- या यात्रेमध्ये स्त्री व पुरुष दोघांनाही मुक्त प्रवेश आहे.
- आपले ओळखपत्र हे स्वतःसोबत ठेवणे बंधनकारक आहे.
- संपुर्ण प्रवासात फक्त शाकाहारीच जेवण दिले जाईल.
- स्वतःला लागणाऱ्या गोळ्या औषधे बरोबर घ्यावीत. ज्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात त्यांनी सुकामेवा, बिस्कीट अशे काही पदार्थ स्वतःसोबत बाळ्गावेत , कारण नाष्टा किंवा जेवणाच्या वेळा मागे – पुढे होऊ शकतात.
- तेथे कोणताही हमाल मिळणार नाही.
- परिक्रमेमध्ये सहभागी होण्याची वैयक्तिक जबाबदारी प्रत्येकाची राहील. याचा विचार करूनच या परिक्रमेत सहभागी व्हा.आपल्या कुटुंबियांना पूर्ण कल्पना देऊनच सहभागी व्हा.
नर्मदा परिक्रमेविषयी महत्वाच्या सूचना
- आपण सर्वजण नर्मदा परिक्रमेला जात आहोत. नर्मदा मैयाची इच्छा असल्याशिवाय परिक्रमा करणे शक्य नसते. आपण सर्व जण नशीबवान आहोत म्हणून आपल्या सर्वाना परिक्रमेचा लाभ होणार आहे.
- नर्मदा परिक्रमा करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात , नर्मदा मैया पावलोपावली आपली परीक्षा बघत असते . त्यामुळे परिक्रमा करतेवेळी आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे .
- रेल्वेतील चहा पाणी नाष्टा व जेवणाचा खर्च वैयक्तिक असेल.
- आपण ज्या ठिकाणी जात आहोत ती अतिशय छोटी खेडेगाव आहेत . तिथे शहरांसारख्या सुखसोयी लवकर उपलब्ध होत नाहीत . आपल्या सर्वाना कोणताही त्रास होऊ नये ह्याची जबाबदारी मैयाने आमच्यावर सोपवली आहे , त्यानुसार त्या लहानश्या खेड्यांमध्येही सुखसोयी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आम्ही करतो . परंतु तरीही अचानक काही अडचणी आल्यास आपल्या कडून सहकार्याची अपेक्षा असेल .
- परिक्रमा हि स्नान न करता सुरु होईल . परिक्रमे दरम्यान आपले दोन वेळा स्नान होईल . दक्षिण तटाची परिक्रमा पूर्ण झाल्यावर एकदा व उत्तर तटाची परिक्रमा पूर्ण झाल्यावर एकदा .
- परिक्रमा करताना नाष्टा देण्याची व्यवस्था होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरूनच चिवडा बाकरवडी असा काही कोरडा खाऊ आणावा म्हणजे परिक्रमा करतेवेळी आपण तो खाऊ शकाल .
- परिक्रमा करतेवेळी सर्वांनी ग्रुपने राहणे आवश्यक आहे .
- परीक्रमे च्या वेळी दक्षिण व उत्तर तटावरील बोटींचा खर्च वैयक्तिक असेल ( साधारण २० – ३० रुपये ).
- ज्यांना रिक्षाने परिक्रमा करायची आहे त्यांनी आपण पोहोचलो कि आपली नावे आमच्याकडे द्यावी , त्या अनुषंगाने आम्ही आपल्याला रिक्षाची व्यवस्था करून देऊ परंतु त्याचा खर्च वैयक्तिक असेल.
- आमचे स्वयंसेवक हे आपल्यापेक्षा वयाने खुप लहान आहेत परंतु या यात्रांचा अनुभव त्यांना जास्त आहे त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूंनी स्वयंसेवकांच्या सूचना पाळणे व सांगितलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपल्याला काहीही गैरसोय होत असल्यास तसे आपण स्वयंसेवकास सांगू शकता , त्याप्रमाणे आपल्याला मदत केली जाईल . यात्रेमध्ये कोणीही स्वयंसेवकांशी चढ्या आवाजात बोलणे , त्यांच्याशी भांडणे करणे असा व्यवहार करू नये . यात्रेमध्ये कोणीही आपापसात देखील भांडू नये .
- साईट सीइंग च्या वेळी वाहनांमध्ये आळीपाळीने पुढे मागे बसावे. कोणाचीही जागा निश्चित स्वरूपाची नाही . हे सर्वानी आपापसात सामंज्यसाने ठरवावे .
- आपणास कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे , परंतु तरीही परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो , या बाबत कोणीही तक्रार करू नये .
- संपूर्ण प्रवासादरम्यान रेल्वेत अथवा मंदिरात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये . रेल्वेमध्ये बेसिन च्या खाली कचऱ्याचा डब्बा असतो त्यामध्येच सर्व कचरा टाकावा .
नर्मदा परिक्रमेसंबंधित काही नियम व अटी
- परिक्रमेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ” या तत्वावर प्रवेश दिला जाईल .
- परिक्रमेचे बुकिंग करतेवेळी स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
- आपण बुकिंग दरम्यान फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल . आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी ३००० रुपये एवढी रक्कम भरणे आवश्यक आहे तसेच उर्वरित रक्कम यात्रेला जाण्याच्या १५ दिवस आधी भरावी लागेल . उर्वरित रक्कम दिलेल्या अवधीत जमा न केल्यास बुकिंग रद्द करण्याचे अधिकार संस्थेला असतील .
- हि रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता . (बँक खात्याचा तपशील शेवटी दिला आहे.)
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून त्यांना यात्रेला येण्यास शक्य होणार नसल्यास बुकिंग करतेवेळी भरलेली रक्कम यात्रेकरूंना माघारी मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
- बहुतांश ठिकाणी अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअर सारख्या सुविधा उपलब्ध असतीलच असे नाही , त्यामुळे अशा ठिकाणी प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो , या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- ट्रीपला जाण्याच्या ठिकाणी नैसर्गिक स्थिती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संस्थेला असतील. तारखांमध्ये बदल करण्यात येणार असेल तर त्याची माहिती १५ दिवस आधी प्रवाशांना देण्यात येईल , त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा असेल.
- जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्याच्या संबंधित सर्व प्रकारचे औषध जवळ बाळगणे आवश्यक आहे.
Warning: Undefined array key “fa_class” in /home/u490433738/domains/shreesadgurutours.com/public_html/wp-content/themes/triply/template-parts/booking/single/additional.php on line 17
परिक्रमेसंबंधित काही महत्वाच्या सूचना
Ø संपूर्ण प्रवासादरम्यान मंदिरात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये. चहाचे कप, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, अन्नपदार्थांची रिकामी पाकिटे, प्लास्टिक पिशव्या , प्लेट्स अथवा कुठल्याही प्रकारचा कचरा हा एका पिशवी मध्ये साठवून ती पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकावी.
Ø प्रवाश्यांचे कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, मित्र, आप्तजन,स्वकिय अथवा ओळखीचे व्यक्ती ; जे आमच्या संस्थेमार्फत ट्रिप ला आलेले नाहीत, अश्या कुठल्याही व्यक्तीला रूम्स , रेस्टोरंटस किंवा साईट सिनिंग मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अश्या प्रकारे काही आढळ्यास प्रवाश्याना दंड करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत.
Ø प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे धूम्रपान तसेच नशा करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळ्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार संस्थेला आहेत.
Ø संपूर्ण प्रवासात आपले सामान आपल्यालाच वाहून न्यावे लागेल.
Ø प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास संस्था त्याला जबाबदार राहणार नाही.
Ø यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारच्या राजकीय, भौतिक तसेच घरगुती विषयांवरील चर्चा कटाक्षाने टाळाव्यात
Ø प्रवासादरम्यान तसेच संपूर्ण यात्रेमध्ये आम्ही नियोजित केलेल्या सहलीचे फ़ोटो व व्हिडिओ , संस्था आठवणी साठी संग्रहित करून ठेवते तसेच संस्थेच्या ट्रिपविषयी प्रचार व प्रसारासाठी वापरू शकते. या बद्दल प्रवाशांना काही आक्षेप असल्यास त्याची तशी पूर्व कल्पना आम्हाला देणे.
Ø नर्मदा परिक्रमा हा एक चैतन्यदायी आणि दैवी आध्यात्मिक अनुभव असल्याने ज्यांना पुरेसा वेळ काढता येईल , त्यांनीच सहभागी व्हावे, अशी भाविकांना नम्र विनंती आहे.
Ø प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा वैयक्तिक सल्ला असेल.
Ø यात्रेमध्ये संस्थेने तयार केलेले नियम व शिस्त पाळणे बंधनकारक असेल.
Ø आम्ही फी म्हणून एवढी रक्कम भरली आहे, आता आम्हाला सर्व सोयी सुविधा वेळच्या वेळी मिळायलाच हव्यात अन भरलेल्या पैश्यांची वसुली झालीच पाहिचे , अशा प्रकारच्या दृष्टीकोन असणाऱ्या व्यक्तींनी कृपया या परिक्रमेत सहभागी होऊ नये, हि विनंती .
Ø प्रवासादरम्यान संस्थेने नेमून दिलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरूंनी पाळणे बंधनकारक असेल.