Special Pithapur Yatra
श्री सद्गुरू टुर्स अँड ट्रॅव्हल्स, साई विहार सोसायटी, कर्वे नगर, पुणे -५२ / संपर्क - ८९८३१९४१५४ / ९७६७११८८०४
Description
Tour Plan
Included/Excluded
More Information
Description
पिठापूर यात्रा –
श्रावण मास विशेष पिठापुर यात्रा (विष्णू आणि महादेव यांच्या अपरिचित मंदिरांचे दर्शन)
श्रीक्षेत्र पिठापूर पिठीकापुरम या नावानेही ओळखले जाते. आंध्र प्रदेश येथे पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये पिठापूर हे क्षेत्र आहे. पिठापूर या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाची स्थापना झाली आहे. श्रीपादांच्या जन्म ठिकाणी मंदिर आणि पादुका असून त्याठिकाणी नित्य पूजा अर्चा सेवा सुरु आहे. श्रीपादश्रीवल्लभ जन्म ठिकाणाजवळ पादगया हे क्षेत्र आहे. हे तीर्थ म्हणजे तलाव असून तेथेच कुक्कुटेश्वर मंदिर आहे. येथे शंकर पार्वती यांनी कोंबडा कोंबडी रूपाने काही काळ वास केला होता अशी कथा आहे. तसेच पिठापूर च्या आसपास देखील अनेक प्राचीन तसेच पुरातन तीर्थक्षेत्र आहेत. त्याचप्रमाणे येथील मंदिर देखील अतिशय भव्य व कोरीव कामाने संपन्न आहेत.
स्थलदर्शन:
- पिठापुरम (श्रीपादश्रीवल्लभ जन्मस्थान)
- राजमुंद्री मार्कंडेय स्वामी मंदिर
- इस्कॉन मंदिर (कृष्णा मंदिर)
- कोटीलिंगेश्वर मंदिर (महादेव मंदिर)
- गायत्री देवी मंदिर
- द्राक्षारामम (महादेव मंदिर)
- माणिक्याम्ब शक्तीपीठ (५१ शक्ती पीठांपैकी एक)
- ऐन्नवेल्ली गणपती (जगातील प्रथम गणपती मंदिर)
- पुरातन राम/सूर्य मंदिर
- कार्तिकेयस्वामी मंदिर
- विशाखापट्टणम
- सिंहाचलम (वराह लक्ष्मी नृसिंह मंदिर – विष्णू मंदिर)
- कैलासगिरी
- अन्नावरम सत्यनारायण मंदिर (विष्णू मंदिर)
- ऐश्वर्यअंबिका मंदिर
- साईबाबा मंदिर(११६ फुट साईबाबांची मूर्ती)
- उप्पाड्डा गावात साडी खरेदी
- कुक्कुटेश्वर(पादगया) (महादेव मंदिर)
- अनघालक्ष्मी मंदिर
- कुंती माधव मंदिर (विष्णू मंदिर)
- ऋषीकोंडा समुद्रकिनारा
- रामबाण मंदिर लेजर शो
- एअरक्राफ्ट/सबमरीन म्युझियम
Tour Plan
Day 1
- मुंबई वरून येणाऱ्या यात्रेकरूंनी सकाळी ०६:५५ च्या LTT VSKP (लोकमान्य टिळक टर्मिनल्स विशाखापट्टणम एक्स्प्रेस) ट्रेन नंबर १८५२० या ट्रेनने पिठापुरम कडे प्रस्थान.
- पुणे वरून येणाऱ्या यात्रेकरूंनी सकाळी १०:१५ च्या LTT VSKP (लोकमान्य टिळक टर्मिनल्स विशाखापट्टणम एक्स्प्रेस) ट्रेन नंबर १८५२० या ट्रेनने पिठापुरम कडे प्रस्थान.
- पहिल्या दिवसाचे दुपारचे जेवण कृपया घरूनच घेऊन यावे.
- रात्रीचे जेवण सिकंदराबाद येथे आमच्यातर्फे देण्यात येईल.
Day 2
- सकाळी ०७:४५ वाजता पिठापूर येथे पोहोचणे.
- फ्रेश होऊन पिठापूर देवस्थानाचे दर्शन.
- दुपारचे जेवण करून राजमुंद्री कडे प्रस्थान.
- राजमुंद्री येथे मार्कंडेय स्वामी ,इस्कॉन मंदिर व कोटीलिंगेश्वर मंदिराचे दर्शन.
- गायत्री देवी मंदिराचे दर्शन
- रात्री गोदावरी आरती पाहणे.
- पिठापूर येथे मुक्काम.
Day 3
- सकाळी काकिनाडाकडे प्रस्थान.
- भवनारायण स्वामी मंदिर, ऐश्वर्य अंबिका मंदिर, रेपूर येथील ११६ फुटी साईबाबांच्या मूर्तीचे दर्शन.
- द्राक्षारामम येथे कोटीपल्ली शिवलिंग व मानिक्याम्बा शक्तीपीठाचे दर्शन.
- ऐनवेल्ली गणपती दर्शन.
- प्राचीन राम मंदिर, प्राचीन सूर्य मंदिर व कार्तिकेय स्वामी मंदिराचे दर्शन
- ११०० वर्ष जुने गणपती मंदिर
- भीमेश्वर स्वामी १४ फुटी स्फटिक शिवलिंग दर्शन.
- रात्री पिठापूर येथे जेवण व मुक्काम.
Day 4
- पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरात सकाळी अभिषेक.
- दुपारी उप्पाड्डा येथे साडी खरेदीसाठी प्रस्थान.
- याच दिवशी अनघालक्ष्मी मंदिराचे दर्शन, गोपालबाबा आश्रम येथे दर्शन
- कुंती माधव मंदिराचे दर्शन ,कुक्कुटेश्वर मंदिराचे दर्शन, पादगया तीर्थ व पुरुहित्तिक शक्तीपीठ दर्शन.
- संध्याकाळी मंदिरात पालखी सेवेचा आनंद घेणे.
- रात्रीचे जेवण व पिठापूर येथे मुक्काम.
Day 5
- सकाळी लवकर अन्नावरम कडे प्रस्थान
- दुपारी सिन्हाचलम येथे वराहलक्ष्मी नृसिंह मंदिराचे दर्शन
- रामबाण मंदिराचे दर्शन
- रामबाण येथे लेझर शो चा आनंद घेणे.
- रात्री विशाखापट्टणम येथे जेवण व मुक्काम.
Day 6
- कैलासगिरी घाट
- ऋशिकोंडा बीच
- ४ वाजता आर. के. समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटणे.
- संध्याकाळी ७ वाजता सबमरीन व एयरक्राफ्ट म्युझीयम बघणे.
- रात्री विशाखापट्टणम येथे जेवण करून पुणे / मुंबई कडे ११:२० च्या VSKP LTT (विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस) ट्रेन नंबर १८५१९ या ट्रेनने प्रस्थान.
Day 7
- दुपारचे जेवण सिकंदराबाद येथे.
- रात्रीचे जेवण सोलापूर येथे.
- रात्री १२ वाजता पुणे येथे पोहोचणे.
Day 8
- पहाटे ४ वाजता मुंबई येथे पोहोचणे.
Included/Excluded
Included
- ३ टियर एसी रेल्वे कोच प्रवास खर्च
- मुंबई/पुणे/सोलापूर ते पिठापूर
- मुंबई/पुणे/सोलापूर ते पिठापूर
- स्थलदर्शनासाठी नॉन ac वाहन ( तवेरा , रिक्षा अशा प्रकारच्या गाड्या)
- दररोज दोन पाण्याची बाटली
- दोन वेळचा चहा, सकाळी नाष्टा, दोन वेळचे जेवण
- राहण्याची सुविधा नॉन ac रुम्स मध्ये २/३ शेरिंग बेसिस (ज्याप्रमाणे ग्रुप असेल त्याप्रमाणे)
Excluded
- रेल्वेतील चहा, पाणी बाटली (फक्त रेल्वेतील)
- रामबाण येथील लेजर शो
- हमाल
- कोणतेही प्रवेश शुल्क अथवा दर्शन पासेस
More Information
पिठापुर यात्रेसंदर्भात माहिती
- श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स अंतर्गत आमची हि 84 वी यात्रा आहे. आजपर्यंत ५१०० भक्तांना या यात्रांमधून श्रीपादश्रीवल्लभ दर्शनाचा लाभ झाला आहे.
- आपण सर्वजण दत्तदर्शनाला जात आहोत. दत्त महाराजांची इच्छा असल्याशिवाय त्यांचे दर्शन करणे शक्य नसते. आपण सर्व जण नशीबवान आहोत म्हणून आपल्या सर्वाना दत्त दर्शनाचा लाभ होणार आहे.
- देवदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, महाराज पावलोपावली आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे देवदर्शन करतेवेळी आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे.
- या यात्रेमध्ये स्त्री व पुरुष दोघांनाही मुक्त प्रवेश आहे .
- पिठापूर दर्शन हि १००% धार्मिक यात्रा आहे. हि कोणतेही पर्यटन अथवा फिरायला जाण्याची ट्रीप नाही. त्यामुळे ज्यांची दत्त महाराजांवर अगाध श्रद्धा आहे त्यांनीच या यात्रेत सहभागी व्हावे.
- संपुर्ण प्रवासात फक्त शाकाहारीच जेवण दिले जाईल .
- पिठापूर या ठिकाणी रोज सकाळी सामूहिक पद्धतीने अभिषेक होतात.
- ज्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात त्यांनी सुकामेवा, बिस्कीट अशे काही पदार्थ स्वतःसोबत बाळ्गावेत , कारण नाष्टा किंवा जेवणाच्या वेळा मागे – पुढे होऊ शकतात .
- आपण ज्या ठिकाणी जात आहोत ती अतिशय छोटी खेडेगाव आहेत. तिथे शहरांसारख्या सुखसोयी लवकर उपलब्ध होत नाहीत. महाराजांच्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये ह्याची जबाबदारी महाराजांनी आमच्यावर सोपवली आहे, त्यानुसार त्या लहानश्या खेड्यांमध्येही सुखसोयी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आम्ही करतो. परंतु तरीही अचानक काही अडचणी आपल्या कडून सहकार्याची अपेक्षा असेल.
- सर्व ठिकाणी गरम पाणी,कमोड व बेड ची व्यवस्था केलेली आहे, परंतु काही वेळा लाईट गेली असल्यास गरम पाणी उपलब्ध करणे शक्य होत नाही. अशा अडचणी सहसा येत नाहीत परंतु आल्या तरी त्यावेळी तिथे सामंजस्याने वागावे.
- आमचे स्वयंसेवक हे आपल्यापेक्षा वयाने खुप लहान आहेत परंतु या यात्रांचा अनुभव त्यांना जास्त आहे त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूंनी स्वयंसेवकांच्या सूचना पाळणे व सांगितलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपल्याला काहीही गैरसोय होत असल्यास तसे आपण स्वयंसेवकास सांगू शकता, त्याप्रमाणे आपल्याला मदत केली जाईल . यात्रेमध्ये कोणीही स्वयंसेवकांशी चढ्या आवाजात बोलणे, त्यांच्याशी भांडणे करणे असा व्यवहार करू नये. यात्रेमध्ये कोणीही आपापसात देखील भांडू नये.
- आमच्या संस्थेमार्फत आपल्याला साईड पर्स व डोक्यावरची कॅप भेट म्हणून दिली जाते. ज्यामध्ये आपण पाण्याची बाटली , नियमित गोळ्या, मेकअप चे सामान , चष्मा, हातरुमाल, पैसे अश्या वस्तू ठेऊ शकता.
पिठापुर यात्रेसंबंधित काही महत्वाच्या सूचना
- संपूर्ण प्रवासादरम्यान रेल्वेत अथवा मंदिरात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये. रेल्वेमध्ये बेसिन च्या खाली कचऱ्याचा डब्बा असतो त्यामध्येच सर्व कचरा टाकावा. चहाचे कप, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, अन्नपदार्थांची रिकामी पाकिटे, प्लास्टिक पिशव्या , प्लेट्स अथवा कुठल्याही प्रकारचा कचरा हा एका पिशवी मध्ये साठवून ती पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकावी.
- प्रवाश्यांचे कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, मित्र, आप्तजन,स्वकिय अथवा ओळखीचे व्यक्ती ; जे आमच्या संस्थेमार्फत यात्रेला आलेले नाहीत, अश्या कुठल्याही व्यक्तीला रूम्स , रेस्टोरंटस किंवा साईट सिनिंग मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अश्या प्रकारे काही आढळ्यास प्रवाश्याना दंड करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत.
- यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारच्या राजकीय, भौतिक तसेच घरगुती विषयांवरील चर्चा कटाक्षाने टाळाव्यात .
- प्रवासादरम्यान तसेच संपूर्ण यात्रेमध्ये आम्ही नियोजित केलेल्या सहलीचे फ़ोटो व व्हिडिओ , संस्था आठवणी साठी संग्रहित करून ठेवते तसेच संस्थेच्या यात्रेविषयी प्रचार व प्रसारासाठी वापरू शकते. या बद्दल प्रवाशांना काही आक्षेप असल्यास त्याची तशी पूर्व कल्पना आम्हाला देणे.
यात्रा रद्द करण्याबाबत नियम
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी ४२०० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे.
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून यात्रेला येणे रहित झाल्यास कोणत्याही कारणास्तव ऍडव्हान्स भरलेली रक्कम आपल्याला परत मिळणार नाही.
- ऐनवेळी महामारी,वादळ,पर्जन्यवृष्टी,पूर,भारतबंद,अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणाने यात्रा रद्द झाल्यास कोणत्याही परीस्थित आपण भरलेली आगाऊ रक्कम आपल्याला परत मिळणार नाही, अशावेळी आपण त्या नंतर यात्रा आयोजित केल्यावर त्यामध्ये सामील होऊ शकता. यामध्ये रेल्वेचे तिकीट रद्द करून परत मिळणारी रक्कम पुढील यात्रेत ग्राह्य धरली जाईल.
- उर्वरित रक्कम यात्रेच्या १५ दिवस आधी भरणे आवश्यक आहे.
नोंदणी रद्द करण्याबाबतचा तक्ता
दिवस | भरलेली रक्कम | परत मिळणारी रक्कम |
नोंदणी करतेवेळी भरलेली रक्कम | 4200/- | कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. |
यात्रेला जाण्याच्या 11 ते 15 दिवस आधी | 21000/- | 15750/- |
यात्रेला जाण्याच्या 5 ते 10 दिवस आधी | 21000/- | 10500/- |
यात्रेला जाण्याच्या 2 ते 4 दिवस आधी | 21000/- | 2100/- |
यात्रेला जाण्याच्या 1 दिवस आधी | 21000/- | 0 |
यात्रेसंबंधित काही नियम व अटी
- यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ” या तत्वावर प्रवेश दिला जाईल .
- यात्रेला येताना स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे . हा फॉर्म आपल्याला whatsapp वर पाठवण्यात येईल. आपण फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल . आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी ४२०० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे.
- हि रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता . (बँकेचा तपशील खाली नमूद केला आहे.).
- यात्रा कालावधीपेक्षा जास्त दिवस आपल्याला राहायचे असल्यास त्याचे अतिरिक्त शुल्क आपल्याला द्यावे लागेल.
- यात्रेमध्ये आम्ही नियोजित केलेल्या सुविधांव्यतिरिक्त अन्य काही जास्तीच्या सुविधा आपणास हव्या असल्यास त्यावर देखील ५% GST आपल्याला भरावा लागेल. (उदा. २ टियर चे तिकिटे)
- आपले ओळखपत्र हे स्वतःसोबत ठेवणे बंधनकारक आहे .
- यात्रेमध्ये आपल्याला दररोज पहाटे उठावे लागते.
- शक्यतो चाकांची बॅग असावी म्हणजे कुठे हमाल मिळाला नाही तर सामान वाहून न्यायला त्रास होणार नाही.
- यात्रेमध्ये सर्वांनाच लोवर बर्थ (रेल्वे मध्ये खालचे सीट ) मिळणे शक्य नाही. शक्य तेवढ्या लवकर बुकिंग केल्यास लोवर बर्थ मिळवणे थोडे सोपे जाते. परंतु तरीही सर्वांनाच लोवर बर्थ मिळेल याची शाश्वती आम्ही देत नाहीत. तसेच ग्रुप असेल तर सर्वांनाच एकाच बोगी मध्ये सीट्स मिळतील याची शाश्वती देऊ शकत नाही
- साईट सीइंग च्या वेळी वाहनांमध्ये आळीपाळीने पुढे मागे बसावे. कोणाचीही जागा निश्चित स्वरूपाची नाही. हे सर्वानी आपापसात सामंज्यसाने ठरवावे.
- आपणास कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे परंतु तरीही परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो, या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- संपूर्ण यात्रेदरम्यान आपल्याला आमच्या कंपनीमार्फत देण्यात येणारी टोपी डोक्यावर घालणे आवश्यक असते.
- जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्याच्या संबंधित सर्व प्रकारचे औषध जवळ बाळगणे आवश्यक आहे.
- बहुतांश ठिकाणी अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअर सारख्या सुविधा उपलब्ध असतीलच असे नाही,त्यामुळे अशा ठिकाणी प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो , या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- यात्रेला जाण्याच्या ठिकाणी नैसर्गिक स्थिती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संस्थेला असतील. तारखांमध्ये बदल करण्यात येणार असेल तर त्याची माहिती १५ दिवस आधी प्रवाशांना देण्यात येईल , त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा असेल.
- प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे धूम्रपान तसेच नशा करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळ्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार संस्थेला आहेत.
- प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास श्री सद्गुरू टूर्स त्याला जबाबदार राहणार नाही. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा वैयक्तिक सल्ला असेल.
- यात्रेमध्ये संस्थेने तयार केलेले नियम व शिस्त पाळणे बंधनकारक असेल.
- प्रवासादरम्यान संस्थेने नेमून दिलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरूंनी पाळणे बंधनकारक असेल.