Pancha Mahabhuta Darshan
श्री सद्गुरू टुर्स अँड ट्रॅव्हल्स, साई विहार सोसायटी, कर्वे नगर, पुणे -५२ / संपर्क - ८९८३१९४१५४ / ९७६७११८८०४
Description
Tour Plan
Included/Excluded
More Information
Description
पंचमहाभूत दर्शन यात्रा (विमान प्रवासासहित)
Tour Plan
दिवस पहिला : पुणे/मुंबई ते चेन्नई – चेन्नई ते श्रीकालहस्ती
- पुणे व मुंबई वरुन पहाटे विमानाने चेन्नई कडे प्रस्थान.
- चेन्नई येथे पोहोचल्यावर बसने श्री कालहस्तीकडे प्रस्थान.
- श्री कालहस्ती येथे वायु लिंगाचे दर्शन
- रात्रीचे जेवण व श्रीकालहस्ती येथे मुक्काम.
दिवस दुसरा : कालहस्ती – कांचीपूरम
- सकाळी नाष्टा करून कांचीपूरम कडे प्रस्थान.
- कांचीपूरम येथे शिवकांची, विष्णुकांची, कांची कामाक्षी व एकंबरेश्वर या पृथ्वी तत्वाच्या लिंगाचे दर्शन.
- कांचीपूरम येथे रात्रीचे जेवण व मुक्काम.
दिवस तिसरा : कांचीपूरम – तिरूअन्नामलाई
- सकाळी नाष्टा करून तिरूयांनामलाई कडे प्रस्थान
- वाटेत जाताना वेल्लोर येथील सुवर्ण मंदिराचे दर्शन.
- तिरूयांनामलाई येथे अरुणाचलेश्वर या अग्नि तत्वाच्या लिंगाचे दर्शन.
- रात्रीचे जेवण व मुक्काम.
दिवस चौथा : तिरूयांनामलाई – चिदंबरम
- सकाळी नाष्टा करून चिदंबरम कडे प्रस्थान.
- चिदंबरम येथे थिल्लई नटराज या आकाश तत्वाच्या लिंगाचे दर्शन.
- तिरूयांनाईमलाई येथे अष्ट दिशा मंदिरांचे दर्शन (परिक्रमा).
- चिदंबरम येथे रात्रीचे जेवण व मुक्काम.
दिवस पाचवा : चिदंबरम – तिरूचिरापल्ली
- सकाळी नाष्टा करून तिरूचिरापल्ली कडे प्रस्थान.
- कुंभकोणम व तंजावर येथील स्थलदर्शन करून तिरूचिरापल्ली येथे रात्री मुक्काम.
दिवस सहावा : तिरूचिरापल्ली
- सकाळी नाष्टा करून श्रीरंगनाथम मंदिराचे दर्शन.
- दुपारी जंबुकेश्वर ह्या जल तत्व लिंगाचे दर्शन.
- तिरूचिरापल्ली येथे रात्री मुक्काम.
दिवस सातवा : चेन्नई – पुणे/मुंबई
- सकाळी नाष्टा करून चेन्नई कडे प्रस्थान.
- चेन्नई येथून विमानाने पुणे/मुंबई कडे प्रस्थान.
Included/Excluded
Included
- पुणे/मुंबई ते चेन्नई व चेन्नई ते पुणे/मुंबई विमानप्रवास
- फिरण्यासाठी AC 2X2 पुश बॅक बस
- दोन पाणी बॉटल
- चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण
- राहण्याची सुविधा 2/3 शेअरिंग डिलक्स किंवा तीन तारांकित हॉटेल मध्ये
Excluded
- कोणत्याही ठिकाणचे प्रवेश शुल्क, व्हि.आय.पी दर्शन शुल्क
- गाईड शुल्क
- स्थानिक ठिकाणी फिरण्यासाठी रिक्षा
More Information
यात्रा रद्द करण्याबाबत नियम
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी १५०००/- रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे.
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून यात्रेला येणे रहित झाल्यास कोणत्याही कारणास्तव ऍडव्हान्स भरलेली रक्कम आपल्याला परत मिळणार नाही.
- ऐनवेळी महामारी,वादळ,पर्जन्यवृष्टी,पूर,भारतबंद,अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणाने यात्रा रद्द झाल्यास कोणत्याही परीस्थित आपण भरलेली आगाऊ रक्कम आपल्याला परत मिळणार नाही, अशावेळी आपण त्या नंतर यात्रा आयोजित केल्यावर त्यामध्ये सामील होऊ शकता. यामध्ये विमान तिकीट रद्द करून परत मिळणारी रक्कम पुढील यात्रेत ग्राह्य धरली जाईल.
- उर्वरित रक्कम यात्रेच्या १५ दिवस आधी भरणे आवश्यक आहे. उर्वरित रक्कम दिलेल्या अवधीत जमा न केल्यास बुकिंग रद्द करण्याचे अधिकार संस्थेला असतील.
नोंदणी रद्द करण्याबाबतचा तक्ता
दिवस | भरलेली रक्कम | परत मिळणारी रक्कम |
नोंदणी करतेवेळी भरलेली रक्कम | १५०००/- | कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. |
यात्रेला जाण्याच्या 11 ते 15 दिवस आधी | ४२०००/- | ३१५००/- |
यात्रेला जाण्याच्या 5 ते 10 दिवस आधी | ४२०००/- | २१०००/- |
यात्रेला जाण्याच्या 2 ते 4 दिवस आधी | ४२०००/- | ४२००/- |
यात्रेला जाण्याच्या 1 दिवस आधी | ४२०००/- | ० |
यात्रेला सोबत आणावयाच्या आवश्यक गोष्टी
- ओळखपत्र : यात्रेदरम्यान आपले ओळखपत्र (जसे कि आधारकार्ड, ड्रायविंग लायसेन्स किंवा मतदान कार्ड यापैकी कोणताही एक ) सोबत बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
- खाऊ : यात्रेमध्ये नाष्ट्याच्या / जेवणाच्या वेळा मागेपुढे होऊ शकतात, त्यासाठी आपण घरूनच काही खाऊ (जसे कि चिवडा , लाडू, खाकरा, चकली, शेव ) घेऊन यावा , जेणेकरून आपल्यापैकी बऱ्याच जणांना सकाळी गोळ्या घ्याव्या लागतात त्यांना थोडस खाऊन गोळ्या घेता येतात.
- औषधे : आपली रोजची बिपी /शुगर किंवा आपल्याला लागणारी नियमित औषधे न विसरता पिशवीत ठेवावे. त्याबरोबरच डोकेदुखी,ताप, सर्दी,पित्त, अंगदुखी अशी काही किरकोळ औषधे पण सोबत असू द्यावीत. ज्यांना गुडघेदुखी , कंबरदुखी , मानदुखीचा त्रास आहे अश्यानी कंबरपट्टा,मानेंचापट्टा ,नीकॅप आठवणीने आणावे.
- शक्यतो सामानासाठी चाकाची बॅग आणावी जेणेकरून आपल्याला सामान वाहून न्यायला अवघड जाणार नाही.
- आपण काही ठिकाणी देवीचे दर्शन घेणार आहोत, आपल्या इच्छेनुसार आपण ओटीचे सामान आणू शकता.
- ज्यांचे 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे त्या यात्रेकरूंना एमबीबीएस डॉक्टर कडून फिटनेस सर्टिफिकेट आणणे आवश्यक आहे.
महत्वाच्या सूचना
- आपण सर्वजण देव दर्शनाला जात आहोत. देवाची इच्छा असल्याशिवाय त्यांचे दर्शन करणे शक्य नसते. आपण सर्व जण नशीबवान आहोत म्हणून आपल्या सर्वाना दर्शनाचा लाभ होणार आहे.
- देवदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, महाराज पावलोपावली आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे देवदर्शन करतेवेळी आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे.
- यात्रेमध्ये आपल्याला दररोज पहाटे उठावे लागते.
- विमान तळावर आपले सामान आपल्यालाच वाहून न्यावे लागेल, त्यानुसार सर्वानी आपल्याला झेपेल एवढेच सामान आणावे. त्यामुळे शक्यतो चाकांची बॅग असावी म्हणजे आपल्याला सामान वाहून न्यायला त्रास होणार नाही.
- यात्रा कालावधीपेक्षा जास्त दिवस आपल्याला राहायचे असल्यास त्याचे अतिरिक्त शुल्क आपल्याला द्यावे लागेल.
- प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅवेल्स त्याला जबाबदार राहणार नाही. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा वैयक्तिक सल्ला असेल.
- यात्रेमध्ये संस्थेने तयार केलेले नियम व शिस्त पाळणे बंधनकारक असेल.
- प्रवासादरम्यान संस्थेने नेमून दिलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरूंनी पाळणे बंधनकारक असेल.
- आमचे स्वयंसेवक हे आपल्यापेक्षा वयाने खुप लहान आहेत परंतु या यात्रांचा अनुभव त्यांना जास्त आहे त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूंनी स्वयंसेवकांच्या सूचना पाळणे व सांगितलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपल्याला काहीही गैरसोय होत असल्यास तसे आपण स्वयंसेवकास सांगू शकता, त्याप्रमाणे आपल्याला मदत केली जाईल . यात्रेमध्ये कोणीही स्वयंसेवकांशी चढ्या आवाजात बोलणे, त्यांच्याशी भांडणे करणे असा व्यवहार करू नये. यात्रेमध्ये कोणीही आपापसात देखील भांडू नये.
- साईट सीइंग च्या वेळी वाहनांमध्ये रोटेशन पद्धतीने बसावे लागेल. कोणाचीही जागा निश्चित स्वरूपाची नाही. हे सर्वानी आपापसात सामंज्यसाने ठरवावे.
- आपणास कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे परंतु तरीही परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो , या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- संपूर्ण प्रवासादरम्यान मंदिरात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये.
- आमच्या संस्थेमार्फत आपल्याला साईड पर्स व डोक्यावरची कॅप भेट म्हणून दिली जाते. ज्यामध्ये आपण पाण्याची बाटली , नियमित गोळ्या, मेकअप चे सामान , चष्मा, हातरुमाल, पैसे अश्या वस्तू ठेऊ शकता. संपूर्ण यात्रेदरम्यान आपल्याला डोक्यावर टोपी घालणे आवश्यक असते.
यात्रा नोंदणीकरिता
- यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ” या तत्वावर प्रवेश दिला जाईल .
- यात्रेला जाण्याच्या दहा दिवस आधी स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे .
- आपण बुकिंग दरम्यान फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल . आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- बुकिंग करतेवेळी आधार कार्ड व एक फोटो आवश्यक आहे. या दोन्हीचे फोटो आपण whatsapp अथवा email द्वारेही पाठवू शकता. नोंदणीकरिता यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी १५००० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे. आपले यात्रेला येणे रहित झाल्यास कोणत्याही कारणास्तव हि रक्कम आपल्याला परत मिळणार नाही.
- हि रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता . (बँकेचा तपशील खाली नमूद केला आहे.)