Omkareshwar, Ujjain, Maheshwar, Indore
श्री सद्गुरू टुर्स अँड ट्रॅव्हल्स, साई विहार सोसायटी, कर्वे नगर, पुणे -५२ / संपर्क - ८९८३१९४१५४ / ९७६७११८८०४
Description
Tour Plan
Included/Excluded
More Information
Description
ओंकारेश्वर-उज्जैन-महेश्वर-इंदोर यात्रा
स्थलदर्शन:
उज्जैन
- महाकालेश्वर मंदिर : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक
- कालभैरवनाथ मंदिर
- मंगलदास : मंगळाचे जन्मठिकाण
- सांदिपणी ऋषींचे आश्रम : भगवान श्रीकृष्णाचे गुरू
- हरसिद्धि माता मंदिर
ओंकारेश्वर
- ओंकारेश्वर: पांडवाद्वारे स्थापित महादेव मंदिर
- ममलेश्वर: १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक
- गजानन महाराजांचे आश्रम
- नर्मदा मैय्याच्या घाटावर स्नान(ऐच्छिक)
महेश्वर
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा
- कार्तवीर्य अर्जुनाचे मंदिर
- नर्मदा मैय्याचा घाट
- गुप्तेश्वर महादेव मंदिर(आदी अनादी मंदिर)
- महेश्वर येथे साडी खरेदी
- मांडू गड: राणी रुपमतीचा महाल
इंदोर
- राजवाडा
- सराफा बाजार
- खजराना गणपती मंदिर
Tour Plan
Day 1
- पुणे/मुंबई येथून इंदोर कडे प्रस्थान.
- रेल्वेची वेळ
- पुणे: दुपारी ३ वाजता , चिंचवड : दुपारी ३:४५ वाजता, लोणावळा: दुपारी ४:४० वाजता
- कर्जत: संध्याकाळी ५:३० वाजता, कल्याण: संध्याकाळी ६:२० वाजता
- भिवंडी रोड: संध्याकाळी ६:५० वाजता, वसई रोड: संध्याकाळी ७:५० वाजता
- (रेल्वेतील रात्रीच्या जेवणाची व्यवस्था स्वतःला करावी लागेल.)
Day 2
- सकाळी ८:३० वाजता इंदोर येथे पोहोचणे.
- हॉटेल मध्ये चेक इन करणे.
- फ्रेश होऊन नाष्टा करणे.
- इंदोर येथील राजवाडा पाहणे.
- दुपारचे जेवण करणे.
- खजराना गणपती मंदिराचे दर्शन करून सराफा बाजार मध्ये शॉपिंग साठी वेळ दिला जाईल.
- रात्रीचे जेवण व इंदोर येथे मुक्काम.
Day 3
- सकाळी नाष्टा करून मांडूगड कडे प्रस्थान.
- मांडुगड येथे राणी रुपमतीचा महाल पाहणे.
- तिथे असणाऱ्या रेवा कुंडाचे दर्शन करणे.
- दुपारी महेश्वर येथे पोहोचणे.
- संध्याकाळी महेश्वर येथे साडी खरेदीकरिता वेळ दिला जाईल.
- महेश्वर येथे रात्रीचा मुक्काम.
Day 4
- सकाळी नर्मदा स्नान करण्यासाठी घाटावर जाणे. (ज्यांची इच्छा असेल त्यांना नेले जाईल, ज्यांना नसेल नर्मदा स्नान करायचे त्यांनी हॉटेलमध्ये अंघोळ केली तरी चालेल.)
- महेश्वर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा पाहणे.
- कार्तवीर्य अर्जुनाचे मंदिर पाहणे.
- दुपारी जेवण करून ओंकारेश्वर कडे प्रस्थान.
- वाटेत जाताना जगातील सर्वात पहिले शिवलिंग मानले जाणाऱ्या गुप्तेश्वर महादेवाचे दर्शन करणे.
- ओंकारेश्वर येथे पोहोचणे व मुक्काम.
Day 5
- ओंकारेश्वर येथे पहाटे नर्मदा स्नान करणे. (ज्यांची इच्छा असेल त्यांना नेले जाईल, ज्यांना नसेल नर्मदा स्नान करायचे त्यांनी हॉटेलमध्ये अंघोळ केली तरी चालेल.)
- ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन.
- ममलेश्वर मंदिराचे दर्शन.
- गजानन महाराज मंदिराचे दर्शन.
- दुपारी जेवण करून उज्जैन कडे प्रस्थान.
- उज्जैन येथे रात्रीचे जेवण व मुक्काम.
- उज्जैन येथे रात्री स्वखर्चाने कॉरिडॉर बघण्यासाठी आपण जाऊ शकता.
Day 6
- उज्जैन येथे महाकालेश्वर मंदिराचे दर्शन.
- ज्यांना व्ही आय पी दर्शन करायचे आहे ज्यांच्यासाठी पास उपलब्ध करून दिले जातील, परंतु याचा अतिरिक्त खर्च द्यावा लागेल.
- ज्यांना व्ही आय पी दर्शन करायचे आहे त्यांना स्त्रियांसाठी साडी व पुरुषांसाठी धोती असा पोशाख करूनच दर्शन करावे लागते.
- यानंतर उज्जैन येथील काळभैरवनाथ मंदिर, हरसिध्दि माता मंदिर, सांदिपनी ऋषींचा आश्रम, मंगलनाथ मंदिर यांचे दर्शन करणे.
- संध्याकाळी ५:३० च्या रेल्वेने पुणे/मुंबई कडे प्रस्थान.
- (रेल्वेतील रात्रीच्या जेवणाची व्यवस्था स्वतःला करावी लागेल.)
Day 7
- पुणे/मुंबई येथे पोहोचणे.
- रेल्वेची वेळ
- पुणे: सकाळी ८:५० वाजता , चिंचवड :सकाळी ०८:१५ वाजता, लोणावळा: सकाळी ०७:४२ वाजता , कर्जत: सकाळी ०६:५३ वाजता, कल्याण: पहाटे ०५:५७ वाजता
- भिवंडी रोड: पहाटे ०५:१८ वाजता, वसई रोड: पहाटे ०४:५० वाजता
Included/Excluded
Included
- मुंबई/पुणे ते इंदोर व इंदोर ते पुणे/मुंबई प्रवास : AC 3 टियर क्लास (रेल्वे) तिकीट
- फिरण्यासाठी AC बस
- चहा, दोन पाणी बॉटल, नाष्टा, दोन वेळचे जेवण (शुद्ध शाकाहारी)
- राहण्याची सुविधा 2/3 शेअरिंग बेसिस वर 3 स्टार हॉटेल मध्ये
Excluded
- लोकल फिरण्यासाठी रिक्षा भाडे
- VIP दर्शन पास
- वैयक्तिक खरेदी
- कुठलेही प्रवेश शुल्क (राजवाडा, मांडुगड)
- रेल्वेतील चहा,पाणी,नाष्टा,जेवण
- ५% GST शुल्क
More Information
यात्रा रद्द करण्याबाबत नियम
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी ४२०० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे.
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून यात्रेला येणे रहित झाल्यास कोणत्याही कारणास्तव ऍडव्हान्स भरलेली रक्कम आपल्याला परत मिळणार नाही.
- ऐनवेळी महामारी,वादळ,पर्जन्यवृष्टी,पूर,भारतबंद,अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणाने यात्रा रद्द झाल्यास कोणत्याही परीस्थित आपण भरलेली आगाऊ रक्कम आपल्याला परत मिळणार नाही, अशावेळी आपण त्या नंतर यात्रा आयोजित केल्यावर त्यामध्ये सामील होऊ शकता. यामध्ये रेल्वेचे तिकीट रद्द करून परत मिळणारी रक्कम पुढील यात्रेत ग्राह्य धरली जाईल.
यात्रेसंबंधित काही नियम व अटी
- यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ” या तत्वावर प्रवेश दिला जाईल .
- यात्रेला येताना स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे . हा फॉर्म आपल्याला whatsapp वर पाठवण्यात येईल. आपण फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल . आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी ४२०० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे.
- हि रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता . (बँकेचा तपशील खाली नमूद केला आहे.).
- यात्रा कालावधीपेक्षा जास्त दिवस आपल्याला राहायचे असल्यास त्याचे अतिरिक्त शुल्क आपल्याला द्यावे लागेल.
- यात्रेमध्ये आम्ही नियोजित केलेल्या सुविधांव्यतिरिक्त अन्य काही जास्तीच्या सुविधा आपणास हव्या असल्यास त्यावर देखील ५% GST आपल्याला भरावा लागेल. (उदा. २ टियर चे तिकिटे)
- आपले ओळखपत्र हे स्वतःसोबत ठेवणे बंधनकारक आहे .
- यात्रेमध्ये आपल्याला दररोज पहाटे उठावे लागते.
- शक्यतो चाकांची बॅग असावी म्हणजे कुठे हमाल मिळाला नाही तर सामान वाहून न्यायला त्रास होणार नाही.
- यात्रेमध्ये सर्वांनाच लोवर बर्थ (रेल्वे मध्ये खालचे सीट ) मिळणे शक्य नाही. शक्य तेवढ्या लवकर बुकिंग केल्यास लोवर बर्थ मिळवणे थोडे सोपे जाते. परंतु तरीही सर्वांनाच लोवर बर्थ मिळेल याची शाश्वती आम्ही देत नाहीत. तसेच ग्रुप असेल तर सर्वांनाच एकाच बोगी मध्ये सीट्स मिळतील याची शाश्वती देऊ शकत नाही
- साईट सीइंग च्या वेळी वाहनांमध्ये आळीपाळीने पुढे मागे बसावे. कोणाचीही जागा निश्चित स्वरूपाची नाही. हे सर्वानी आपापसात सामंज्यसाने ठरवावे.
- आपणास कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे परंतु तरीही परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो, या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- संपूर्ण यात्रेदरम्यान आपल्याला आमच्या कंपनीमार्फत देण्यात येणारी टोपी डोक्यावर घालणे आवश्यक असते.
- जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्याच्या संबंधित सर्व प्रकारचे औषध जवळ बाळगणे आवश्यक आहे.
- बहुतांश ठिकाणी अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअर सारख्या सुविधा उपलब्ध असतीलच असे नाही,त्यामुळे अशा ठिकाणी प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो , या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- यात्रेला जाण्याच्या ठिकाणी नैसर्गिक स्थिती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संस्थेला असतील. तारखांमध्ये बदल करण्यात येणार असेल तर त्याची माहिती १५ दिवस आधी प्रवाशांना देण्यात येईल , त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा असेल.
- प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे धूम्रपान तसेच नशा करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळ्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार संस्थेला आहेत.
- प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास श्री सद्गुरू टूर्स त्याला जबाबदार राहणार नाही. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा वैयक्तिक सल्ला असेल.
- यात्रेमध्ये संस्थेने तयार केलेले नियम व शिस्त पाळणे बंधनकारक असेल.
- प्रवासादरम्यान संस्थेने नेमून दिलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरूंनी पाळणे बंधनकारक असेल.
यात्रे संदर्भात माहिती
- श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स अंतर्गत आमची हि ११ वी यात्रा आहे. आजपर्यंत ५०० भक्तांना या यात्रांमधून दर्शनाचा लाभ झाला आहे.
- आपण सर्वजण दर्शनासाठी जात आहोत. दत्त महाराजांची इच्छा असल्याशिवाय त्यांचे दर्शन करणे शक्य नसते. आपण सर्व जण नशीबवान आहोत म्हणून आपल्या सर्वाना दत्त दर्शनाचा लाभ होणार आहे.
- देवदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, महाराज पावलोपावली आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे देवदर्शन करतेवेळी आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे.
- या यात्रेमध्ये स्त्री व पुरुष दोघांनाही मुक्त प्रवेश आहे .
- हि १००% धार्मिक यात्रा आहे. हि कोणतेही पर्यटन अथवा फिरायला जाण्याची ट्रीप नाही. त्यामुळे ज्यांची देवावर अगाध श्रद्धा आहे त्यांनीच या यात्रेत सहभागी व्हावे.
- संपुर्ण प्रवासात फक्त शाकाहारीच जेवण दिले जाईल .
- ज्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात त्यांनी सुकामेवा, बिस्कीट अशे काही पदार्थ स्वतःसोबत बाळ्गावेत , कारण नाष्टा किंवा जेवणाच्या वेळा मागे – पुढे होऊ शकतात .
- आपण ज्या ठिकाणी जात आहोत तिथे अचानक काही अडचणी आपल्या कडून सहकार्याची अपेक्षा असेल.
- आमचे स्वयंसेवक हे आपल्यापेक्षा वयाने खुप लहान आहेत परंतु या यात्रांचा अनुभव त्यांना जास्त आहे त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूंनी स्वयंसेवकांच्या सूचना पाळणे व सांगितलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपल्याला काहीही गैरसोय होत असल्यास तसे आपण स्वयंसेवकास सांगू शकता, त्याप्रमाणे आपल्याला मदत केली जाईल . यात्रेमध्ये कोणीही स्वयंसेवकांशी चढ्या आवाजात बोलणे, त्यांच्याशी भांडणे करणे असा व्यवहार करू नये. यात्रेमध्ये कोणीही आपापसात देखील भांडू नये.
- आमच्या संस्थेमार्फत आपल्याला साईड पर्स व डोक्यावरची कॅप भेट म्हणून दिली जाते. ज्यामध्ये आपण पाण्याची बाटली , नियमित गोळ्या, मेकअप चे सामान , चष्मा, हातरुमाल, पैसे अश्या वस्तू ठेऊ शकता.
यात्रेसंबंधित काही महत्वाच्या सूचना
- संपूर्ण प्रवासादरम्यान रेल्वेत अथवा मंदिरात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये. रेल्वेमध्ये बेसिन च्या खाली कचऱ्याचा डब्बा असतो त्यामध्येच सर्व कचरा टाकावा. चहाचे कप, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, अन्नपदार्थांची रिकामी पाकिटे, प्लास्टिक पिशव्या , प्लेट्स अथवा कुठल्याही प्रकारचा कचरा हा एका पिशवी मध्ये साठवून ती पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकावी.
- प्रवाश्यांचे कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, मित्र, आप्तजन,स्वकिय अथवा ओळखीचे व्यक्ती ; जे आमच्या संस्थेमार्फत यात्रेला आलेले नाहीत, अश्या कुठल्याही व्यक्तीला रूम्स , रेस्टोरंटस किंवा साईट सिनिंग मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अश्या प्रकारे काही आढळ्यास प्रवाश्याना दंड करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत.
- यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारच्या राजकीय, भौतिक तसेच घरगुती विषयांवरील चर्चा कटाक्षाने टाळाव्यात .
- प्रवासादरम्यान तसेच संपूर्ण यात्रेमध्ये आम्ही नियोजित केलेल्या सहलीचे फ़ोटो व व्हिडिओ , संस्था आठवणी साठी संग्रहित करून ठेवते तसेच संस्थेच्या यात्रेविषयी प्रचार व प्रसारासाठी वापरू शकते. या बद्दल प्रवाशांना काही आक्षेप असल्यास त्याची तशी पूर्व कल्पना आम्हाला देणे.