Kashi Yatra
श्री सद्गुरू टुर्स अँड ट्रॅव्हल्स, साई विहार सोसायटी, कर्वे नगर, पुणे -५२ / संपर्क - ८९८३१९४१५४ / ९७६७११८८०४
Description
Tour Plan
Included/Excluded
More Information
Description
वाराणसी – प्रयागराज – गया – अयोध्या दर्शन यात्रा २०२४
Tour Plan
Day 1 – पुणे- प्रयागराज
- पुण्यावरून सकाळी रेल्वेने मुंबई कडे प्रस्थान.
- मुंबई वरून रेल्वेने प्रयागराज कडे प्रस्थान.
Day 2 – प्रयागराज-अयोध्या
- प्रयागराज येथे पोहोचणे.
- प्रयागराज येथून बस ने अयोध्येकडे प्रस्थान.
- अयोध्या येथे फ्रेश होऊन श्रीराम जन्मभूमी, कनक भवन, हनुमान गढी, शरयू नदी यांचे दर्शन करणे.
- रात्री अयोध्या येथे जेवण व मुक्काम.
Day 3 – अयोध्या – नैमिष्यारण्य
- सकाळी नाष्टा करून नैमिष्यारण्य कडे प्रस्थान.
- येथे चक्रतीर्थ, हनुमान गढी, ललिता देवी मंदिर, व्यास गढी, पुराण मंदिर यांचे सर्वांचे दर्शन.
- रात्रीचे जेवण व नैमिष्यारण्य येथे मुक्काम.
Day 4 – नैमिष्यारण्य -प्रयागराज
- नैमिष्यारण्य वरून प्रयागराज कडे प्रस्थान
- यानंतर हनुमान मंदिर, आनंदभुवन, अलोपी देवी मंदिर, नवग्रह मंदिराचे दर्शन.
- प्रयागराज येथे रात्रीचे जेवण व मुक्काम.
Day 5 – प्रयागराज – चित्रकुट – प्रयागराज
- सकाळी नाष्टा करून चित्रकुट कडे प्रस्थान.
- चित्रकुट येथे रामघाट, कामदगिरी भारत कुप, भरत मिलाप मंदिर, गुप्त गोदावरी, जानकी कुंड, सती अनुसूया आश्रम, स्फटिक शिळा, लक्ष्मण चौकी, रामशैया यांचे दर्शन.
- संध्याकाळी प्रयागराज येथे परतणे.
- प्रयागराज येथे जेवण व मुक्काम.
Day 6 – प्रयागराज- वाराणसी
- सकाळी त्रिवेणी संगम येथे स्नान करून वाराणसी कडे प्रस्थान.
- काशी विश्वेश्वराचे मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, विशालाक्षी मंदिर, कालभैरवनाथ मंदिराचे दर्शन.
- वाराणसी येथे जेवण व मुक्काम.
Day 7 – वाराणसी
- पहाटे गंगा स्नान
- बनारसी साडी खरेदी करिता मोकळा वेळ
- दुपारी बोधगया कडे प्रस्थान
- बोधगया येथे रात्रीचे जेवण व मुक्काम.
Day 8 – बोधगया
- सकाळी तर्पण विधी करणे
- बोधगया येथे महाबोधी मंदिराचे दर्शन, बोधिवृक्ष यांचे दर्शन.
- रात्री बोधगया येथे जेवण.
- रात्री १२ वाजता पुणे कडे रेल्वेने प्रस्थान (पुणे प्रवासी).
Day 9 – बोधगया
- पहाटे ५ च्या ट्रेन ने मुंबई कडे प्रस्थान (मुंबई प्रवासी)
Day 10
- मुंबई येथे पोहोचणे.
- पुणे येथे पोहचणे.
Included/Excluded
Included
- सर्वप्रवास AC 3 टियर रेल्वेने
- फिरण्यासाठी AC 2X2 पुश बॅक बस
- दोन पाणी बॉटल
- चहा, नाष्टा, रात्रीचे जेवण
- राहण्याची सुविधा 2/3 शेअरिंग डिलक्स किंवा तीन तारांकित हॉटेल मध्ये.
Excluded
- रेल्वे मधील जेवण ,चहा ,पाणी
- दुपारचे जेवण
- कोणत्याही ठिकाणचे प्रवेश शुल्क, व्हि.आय.पी दर्शन शुल्क
- स्थानिक ठिकाणे फिरण्यासाठीची वाहने
- नौकाविहार शुल्क
- श्राद्ध / तर्पण शुल्क
More Information
यात्रा रद्द करण्याबाबत नियम
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी ७००० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे.
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून यात्रेला येणे रहित झाल्यास कोणत्याही कारणास्तव ऍडव्हान्स भरलेली रक्कम आपल्याला परत मिळणार नाही.
- ऐनवेळी महामारी,वादळ,पर्जन्यवृष्टी,पूर,भारतबंद,अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणाने यात्रा रद्द झाल्यास कोणत्याही परीस्थित आपण भरलेली आगाऊ रक्कम आपल्याला परत मिळणार नाही, अशावेळी आपण त्या नंतर यात्रा आयोजित केल्यावर त्यामध्ये सामील होऊ शकता. यामध्ये रेल्वेचे तिकीट रद्द करून परत मिळणारी रक्कम पुढील यात्रेत ग्राह्य धरली जाईल.
यात्रेला सोबत आणावयाच्या आवश्यक गोष्टी
- ओळखपत्र: यात्रेदरम्यान आपले ओळखपत्र (जसे कि आधारकार्ड, ड्रायविंग लायसेन्स किंवा मतदान कार्ड यापैकी कोणताही एक) सोबत बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
- खाऊ: यात्रेमध्ये नाष्ट्याच्या / जेवणाच्या वेळा मागेपुढे होऊ शकतात, त्यासाठी आपण घरूनच काही खाऊ (जसे कि चिवडा, लाडू, खाकरा, चकली, शेव) घेऊन यावा, जेणेकरून आपल्यापैकी बऱ्याच जणांना सकाळी गोळ्या घ्याव्या लागतात त्यांना थोडस खाऊन गोळ्या घेता येतात.
- औषधे: आपली रोजची बिपी / शुगर किंवा आपल्याला लागणारी नियमित औषधे न विसरता पिशवीत ठेवावे. त्याबरोबरच डोकेदुखी, ताप, सर्दी, पित्त, अंगदुखी अशी काही किरकोळ औषधे पण सोबत असू द्यावीत. ज्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखीचा त्रास आहे अश्यानी कंबरपट्टा, मानेंचापट्टा, नीकॅप आठवणीने आणावे.
- शक्यतो सामानासाठी चाकाची बॅग आणावी जेणेकरून आपल्याला सामान वाहून न्यायला अवघड जाणार नाही.
- आपण सीतामढी शक्तीपिठांच दर्शन घेणार आहोत, आपल्या इच्छेनुसार आपण ओटीचे सामान आणू शकता.
- पुरुष मंडळीना पिंडदानासाठी सोवळे अथवा पांढरी लुंगी आणणे आवश्यक आहे.
महत्वाच्या सूचना
- आपण सर्वजण देव दर्शनाला जात आहोत. देवाची इच्छा असल्याशिवाय त्यांचे दर्शन करणे शक्य नसते. आपण सर्व जण नशीबवान आहोत म्हणून आपल्या सर्वाना दर्शनाचा लाभ होणार आहे.
- देवदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, महाराज पावलोपावली आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे देवदर्शन करतेवेळी आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे.
- यात्रेमध्ये आपल्याला दररोज पहाटे उठावे लागते.
- रेल्वे स्टेशन वर आपले सामान आपल्यालाच वाहून न्यावे लागेल, त्यानुसार सर्वानी आपल्याला झेपेल एवढेच सामान आणावे. त्यामुळे शक्यतो चाकाची बॅग असावी म्हणजे आपल्याला सामान वाहून न्यायला त्रास होणार नाही.
- यात्रा कालावधीपेक्षा जास्त दिवस आपल्याला राहायचे असल्यास त्याचे अतिरिक्त शुल्क आपल्याला द्यावे लागेल.
- यात्रेमध्ये सर्वांनाच लोवर बर्थ (रेल्वे मध्ये खालचे सीट ) मिळणे शक्य नसतो. शक्य तेवढ्या लवकर बुकिंग केल्यास लोवर बर्थ मिळवणे थोडे सोपे जाते. परंतु तरीही सर्वांनाच लोवर बर्थ मिळेल याची शाश्वती आम्ही देत नाहीत. तसेच ग्रुप असेल तर सर्वांनाच एकाच बोगी मध्ये सीट मिळतील याची शाश्वती देऊ शकत नाही.
- प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास श्री सद्गुरू टूर्स त्याला जबाबदार राहणार नाहीत. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत ब
Warning: Undefined array key “fa_class” in /home/u490433738/domains/shreesadgurutours.com/public_html/wp-content/themes/triply/template-parts/booking/single/additional.php on line 17
यात्रा नोंदणीकरिता
- यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ” या तत्वावर प्रवेश दिला जाईल.
- यात्रेला जाण्याच्या दहा दिवस आधी स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
- आपण बुकिंग दरम्यान फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल. आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- बुकिंग करतेवेळी आधार कार्ड व एक फोटो आवश्यक आहे. या दोन्हीचे फोटो आपण WhatsApp अथवा email द्वारेही पाठवू शकता. नोंदणीकरिता यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी ७००० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे. आपले यात्रेला येणे रहित झाल्यास कोणत्याही कारणास्तव हि रक्कम आपल्याला परत मिळणार नाही.
- उर्वरित रक्कम यात्रेला जाण्याच्या १५ दिवस आधी भरावी लागेल. उर्वरित रक्कम दिलेल्या अवधीत जमा न केल्यास बुकिंग रद्द करण्याचे अधिकार संस्थेला असतील.
- ही रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता. (बँकेचा तपशील खाली नमूद केला आहे.)
- ऐनवेळी महामारी, वादळ, पर्जन्यवृष्टी, पूर, भारतबंद, अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कार