Jagannath Puri
श्री सद्गुरू टुर्स अँड ट्रॅव्हल्स, साई विहार सोसायटी, कर्वे नगर, पुणे -५२ / संपर्क - ८९८३१९४१५४ / ९७६७११८८०४
Description
Tour Plan
Included/Excluded
More Information
Description
जगन्नाथ पुरी – गंगासागर दर्शन यात्रा
जगन्नाथ मंदिर हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली.
स्थलदर्शन:
- जगन्नाथ पुरी
- कोणार्क सूर्यमंदिर
- चिल्का सरोवर
- भुवनेश्वर
- गंगासागर
- कलकत्ता
Tour Plan
दिवस १ ला
- रेल्वेने पुणे / मुंबई वरुन कलकत्ताकडे प्रस्थान.
दिवस २ रा
- संपूर्ण दिवस रेल्वे मध्ये.
दिवस ३ रा
- पहाटे विमानाद्वारे कलकत्ताकडे प्रस्थान.
- रेल्वे किंवा विमानाद्वारे कलकत्ता येथे पोहोचणे.
- कलकत्ता येथे हॉटेल मध्ये चेक इन करणे.
- कलकत्ता येथे स्थलदर्शन करणे. कलकत्ता येथे रात्रीचा मुक्काम.
दिवस ४ था
- सकाळी गंगासागर कडे प्रयाण करणे.
- गंगासागर येथे कपिल मुनींच्या आश्रमाचे दर्शन करणे.
- रात्री कलकत्ता येथून पुरीकडे रेल्वेद्वारे प्रस्थान.
दिवस ५ वा
- सकाळी पुरी येथे पोहोचणे.
- हॉटेलमध्ये चेक इन करणे. फ्रेश होऊन जगन्नाथ मंदिराचे दर्शन करणे.
- संध्याकाळी समुद्रावर सूर्यास्त बघणे.
दिवस ६ वा
- सकाळी पुरी येथून चिल्का सरोवर बघण्यासाठी प्रस्थान.
- रात्री जगन्नाथ पुरी येथे मुक्काम.
दिवस ७ वा
- सकाळी पुरी येथून कोणार्क सूर्यमंदिराकडे प्रस्थान.
- संध्याकाळी भुवनेश्वर येथे पोहोचणे व मुक्काम .
दिवस ८ वा
- सकाळी भुवनेश्वर येथील काही स्थल दर्शन करणे.
- दुपारी रेल्वे/ अथवा विमानाद्वारे परतीचा प्रवास सुरू.
- संध्याकाळी विमानाद्वारे पुणे/मुंबई येथे पोहोचणे.
दिवस ९ वा
- संपूर्ण दिवस रेल्वेमध्ये.
दिवस १० वा
- पहाटे पुणे/मुंबई येथे पोहोचणे.
Included/Excluded
Included
- रेल्वे प्रवास AC 3 टियर क्लास किंवा विमानप्रवास (आपण निवड कराल त्याप्रमाणे)
- लोकल प्रवास एसी गाडीने
- दोन लीटर पाणी
- सकाळी चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण
- राहण्याची सुविधा डिलक्स हॉटेलमध्ये (२/३ शेयरिंग बेसिस वर)
- कलकत्ता ते भुवनेश्वर रेल्वे प्रवास (3 टियर एसी क्लास)
Excluded
- रेल्वेतील / विमानातील जेवण
- कोणत्याही ठिकाणचे एंट्री तिकीट
- स्थानिक रिक्षा
- गंगासागर बोट तिकीट
- इतर कोणत्याही गोष्टी ज्या समाविष्ट घटकात नाही
More Information
यात्रा रद्द करण्याबाबत नियम
- बुकिंग करतेवेळी एकूण रक्कमेपैकी रेल्वे साठी ५००० व विमान प्रवासासाठी २०००० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे.
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून यात्रेला येणे रहित झाल्यास कोणत्याही कारणास्तव ऍडव्हान्स भरलेली रक्कम आपल्याला परत मिळणार नाही.
- ऐनवेळी महामारी,वादळ,पर्जन्यवृष्टी,पूर,भारतबंद,अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणाने यात्रा रद्द झाल्यास कोणत्याही परीस्थित आपण भरलेली आगाऊ रक्कम आपल्याला परत मिळणार नाही, अशावेळी आपण त्या नंतर यात्रा आयोजित केल्यावर त्यामध्ये सामील होऊ शकता. यामध्ये रेल्वेचे तिकीट रद्द करून परत मिळणारी रक्कम पुढील यात्रेत ग्राह्य धरली जाईल.
- उर्वरित रक्कम यात्रेला जाण्याच्या १५ दिवस आधी भरणे आवश्यक आहे.
नोंदणी रद्द करण्याबाबतचा तक्ता
दिवस | भरलेली रक्कम | परत मिळणारी रक्कम | ||
रेल्वे प्रवास | विमान प्रवास | रेल्वे प्रवास | विमान प्रवास | |
नोंदणी करतेवेळी भरलेली रक्कम | 5000/- | 20000/- | कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. | |
यात्रेला जाण्याच्या 11 ते 15 दिवस आधी | 30000/- | 45000/- | 22500/- | 33750/- |
यात्रेला जाण्याच्या 5 ते 10 दिवस आधी | 30000/- | 45000/- | 15000/- | 22500/- |
यात्रेला जाण्याच्या 2 ते 4 दिवस आधी | 30000/- | 45000/- | 3000/- | 4500/- |
यात्रेला जाण्याच्या 1 दिवस आधी | 30000/- | 45000/- | 0 | 0 |
यात्रेसंबधित काही नियम व अटी
- यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य “ या तत्वावर प्रवेश दिला जाईल.
- यात्रेला येताना स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म आपल्याला whatsapp वर पाठवण्यात येईल. आपण फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल. आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- बुकिंग करतेवेळी भरायची रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाइन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता. (बँकेचा तपशील खाली नमूद केला आहे.).
- यात्रा कालावधीपेक्षा जास्त दिवस आपल्याला राहायचे असल्यास त्याचे अतिरिक्त शुल्क आपल्याला द्यावे लागेल.
- आपले ओळखपत्र स्वतः सोबत बाळगणे आवश्यक आहे.
- यात्रेमध्ये आपल्याला दररोज पहाटे उठावे लागते.
- काही रेल्वे स्टेशन छोटे असल्यामुळे त्या ठिकाणी हमालाची व्यवस्था नसते, त्यानुसार सर्वानी आपल्याला झेपेल एवढेच सामान आणावे. शक्यतो चाकांची बॅग असावी म्हणजे कुठे हमाल मिळाला नाही तर सामान वाहून न्यायला त्रास होणार नाही.
- यात्रेमध्ये सर्वांनाच लोवर बर्थ (रेल्वे मध्ये खालचे सीट) मिळणे शक्य नाही. शक्य तेवढ्या लवकर बुकिंग केल्यास लोवर बर्थ मिळवणे थोडे सोपे जाते. परंतु तरीही सर्वांनाच लोवर बर्थ मिळेल याची शाश्वती आम्ही देत नाहीत. तसेच ग्रुप असेल तर सर्वांनाच एकाच बोगी मध्ये सीट्स मिळतील याची शाश्वती देऊ शकत नाही.
- साईट सीइंग च्या वेळी वाहनांमध्ये आळीपाळीने पुढे मागे बसावे. कोणाचीही जागा निश्चित स्वरूपाची नाही. हे सर्वानी आपापसात सामंज्यसाने ठरवावे.
- आपणास कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे परंतु तरीही परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो, या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- संपूर्ण यात्रेदरम्यान आपल्याला आमच्या कंपनीमार्फत देण्यात येणारी टोपी डोक्यावर घालणे आवश्यक असते.
- जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्याच्या संबधित सर्व प्रकारचे औषध जवळ बाळगणे आवश्यक आहे.
- बहुतांश ठिकाणी अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेयर सारख्या सुविधा उपलब्ध असतीलच असे नाही, त्यामुळे अशा ठिकाणी प्रवाश्यांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. तसेच परिस्थितिनुरूप कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल होऊ शकतो, या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- यात्रेला जाण्याच्या ठिकाणी नैसर्गिक स्थिती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संस्थेला असतील. तारखांमध्ये बदल करण्यात येणार असेल तर त्याची माहिती १५ दिवस आधी प्रवाशांना देण्यात येईल, त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा असेल. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे धूम्रपान तसेच नशा करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळ्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार संस्थेला आहेत.
- प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास श्री सद्गुरू टूर्स त्याला जबाबदार राहणार नाही. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा वैयक्तिक सल्ला असेल.
- यात्रेमध्ये संस्थेने तयार केलेले नियम व शिस्त पाळणे बंधनकारक असेल.
- प्रवासादरम्यान संस्थेने नेमून दिलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरूंनी पाळणे बंधनकारक असेल.
यात्रेसंदर्भात माहिती
- श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स अंतर्गत आमची हि १० वी यात्रा आहे. आजपर्यंत ४०० भक्तांना या यात्रांमधून दर्शनाचा लाभ झाला आहे.
- आपण सर्वजण देव दर्शनाला जात आहोत. देवाची इच्छा असल्याशिवाय त्यांचे दर्शन करणे शक्य नसते. आपण सर्व जण नशीबवान आहोत म्हणून आपल्या सर्वाना दर्शनाचा लाभ होणार आहे.
- देवदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, देव पावलोपावली आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे देवदर्शन करतेवेळी आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे.
- या यात्रेमध्ये स्त्री व पुरुष दोघांनाही मुक्त प्रवेश आहे .
- हि १००% धार्मिक यात्रा आहे. हि कोणतेही पर्यटन अथवा फिरायला जाण्याची ट्रीप नाही. त्यामुळे ज्यांची देवावर अगाध श्रद्धा आहे त्यांनीच या यात्रेत सहभागी व्हावे.
- संपुर्ण प्रवासात फक्त शाकाहारीच जेवण दिले जाईल .
- ज्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात त्यांनी सुकामेवा, बिस्कीट अशे काही पदार्थ स्वतःसोबत बाळ्गावेत , कारण नाष्टा किंवा जेवणाच्या वेळा मागे-पुढे होऊ शकतात .
- आमचे स्वयंसेवक हे आपल्यापेक्षा वयाने खुप लहान आहेत परंतु या यात्रांचा अनुभव त्यांना जास्त आहे त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूंनी स्वयंसेवकांच्या सूचना पाळणे व सांगितलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपल्याला काहीही गैरसोय होत असल्यास तसे आपण स्वयंसेवकास सांगू शकता, त्याप्रमाणे आपल्याला मदत केली जाईल . यात्रेमध्ये कोणीही स्वयंसेवकांशी चढ्या आवाजात बोलणे, त्यांच्याशी भांडणे करणे असा व्यवहार करू नये. यात्रेमध्ये कोणीही आपापसात देखील भांडू नये.
- आमच्या संस्थेमार्फत आपल्याला साईड पर्स व डोक्यावरची कॅप भेट म्हणून दिली जाते. ज्यामध्ये आपण पाण्याची बाटली , नियमित गोळ्या, मेकअप चे सामान , चष्मा, हातरुमाल, पैसे अश्या वस्तू ठेऊ शकता.
यात्रेसंबंधित काही महत्वाच्या सूचना
- संपूर्ण प्रवासादरम्यान रेल्वेत अथवा मंदिरात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये. रेल्वेमध्ये बेसिन च्या खाली कचऱ्याचा डब्बा असतो त्यामध्येच सर्व कचरा टाकावा. चहाचे कप, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, अन्नपदार्थांची रिकामी पाकिटे, प्लास्टिक पिशव्या , प्लेट्स अथवा कुठल्याही प्रकारचा कचरा हा एका पिशवी मध्ये साठवून ती पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकावी.
- प्रवाश्यांचे कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, मित्र, आप्तजन,स्वकिय अथवा ओळखीचे व्यक्ती ; जे आमच्या संस्थेमार्फत यात्रेला आलेले नाहीत, अश्या कुठल्याही व्यक्तीला रूम्स , रेस्टोरंटस किंवा साईट सिनिंग मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अश्या प्रकारे काही आढळ्यास प्रवाश्याना दंड करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत.
- यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारच्या राजकीय, भौतिक तसेच घरगुती विषयांवरील चर्चा कटाक्षाने टाळाव्यात.
- प्रवासादरम्यान तसेच संपूर्ण यात्रेमध्ये आम्ही नियोजित केलेल्या सहलीचे फ़ोटो व व्हिडिओ , संस्था आठवणी साठी संग्रहित करून ठेवते तसेच संस्थेच्या यात्रेविषयी प्रचार व प्रसारासाठी वापरू शकते. या बद्दल प्रवाशांना काही आक्षेप असल्यास त्याची तशी पूर्व कल्पना आम्हाला देणे.