Girnar Somnath Dwaraka Yatra
गिरनार -सोमनाथ – द्वारका – बेट द्वारका दर्शन यात्रा
गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वात उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गुजरात राज्याच्या जुनागढ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरिनारायण असून त्यांचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हंटले जाते. त्याचा घुमटाकृती मध्यभाग डायोराइट व मॉंझोनाइट यांचा बनलेला आहे.
ऐतिहासिक संदर्भ :
गिरनार चे प्राचीन नावे, उर्ज्जयंत , रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र असे आहे. सुभद्राहरण येथेच झाले. श्रीकृष्ण कालीन रैवतक महायात्रा येथे हल्ली कार्तिक शुद्ध एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत भरते. अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारच्या उल्लेख सापडतात. जैनांचे पहिला तीर्थंकर ऋषभदेव यांनीही त्याचा उल्लेख केला आहे.
धार्मिक महत्व :
सौराष्ट्रातील जुनागढ जवळचे हे स्थान दत्त उपासनेचे एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमातून दत्त उपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या नावाने उभे आहे. हे दत्त मंदिर जुनागढ जवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. अश्या ठिकाणी समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, त्याला विशेष अर्थ आहे.
गिरनार हे शाक्त , दत्त व जैन पंथीयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्वाचे शक्तीपीठ मानले जाते. नवपरिणीत दांम्पत्यास देवीच्या पायावर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर हि गोरक्षनाथांची व गुरुशिखर हि दत्तात्रेयांची तपोभूमी म्हणून दाखविली जाते .जैनांच्या २२ वा तीर्थंकर नेमिनाथ यांचे निर्वाण गिरनार वर झाले. नेमिनाथ शिखरावर त्यांचे भव्य व संपन्न देवालय आहे. गिरनार वर गोमुखी, हनुमान धारा व कमंडलू हे पवित्र कुंड आहे.
जुनागढ पासून ८ किमी अंतावरील गिरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात . हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्य शिखरावर गुरु गोरक्षनाथांचे मंदिर आहे आणि यांच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. दत्तस्थानांपर्यंत जाईपर्यंत सुमारे १०,००० पायऱ्यांची चढउतार करावी लागते.
गिरनार पर्वताच्या उत्तरेस कुमुदपर्वत , मध्ये गिरनार तर दक्षिणेला रैवत पर्वत आहे. गिरनार चढताना पहिल्या टप्यात आपल्याला जैन मंदिर लागते तर ४,००० पायऱ्या चढल्यावर अंबा मातेचे मंदिर आहे. त्यांनतर गोरक्षनाथांच्या पादुका असून अंतिम टप्याचे शिखर म्हणजे गुरुदत्त शिखर. येथे दत्तत्रयांच्या स्वयंभू पादुका आणि दत्त मूर्ती आहे. संपुर्ण गिरनार चढण्यासाठी, १०००० पायऱ्या असल्याने तसेच काही ठिकाणी सरळ चढण असल्याने डोली वाल्यांच्या मदतीने अनेकजण जातात तर काही जण हे या पायऱ्या चढुन जातात. डोली केली तरी पायऱ्या चढणे काही चुकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे, कारण डोलीवाले आपल्याला येथे मध्ये मध्ये खाली उतरवून चालायला लावतात . मात्र , ज्या ठिकाणी कठीण चढण आहे तेथे आपल्याला परत डोलीत बसवतात , तसेच डोलीवाले सुद्धा ४-५ पायऱ्या चढल्यानांतर थांबतात. संपूर्ण गिरनार चढताना वाटेत केवळ ५-६ दुकानेच आपल्याला लागतात. येथे पाण्याच्या बाटल्या , बिस्किटे तसेच फळे मिळतात. पर्वत चढताना आपल्याकडे टॉर्च असणे गरजेचे आहे मात्र या टॉर्च बरोबरच आपल्याला गिरनार पायथ्याला काठी घेणे आवश्यक असते . पर्वत चढताना आणि उतरताना आपल्याला त्याचाच आधार घ्यावा लागतो. पर्वत चढताना आपल्याला ५००० पायऱ्यांचा टप्पा ओलांडला कि आपल्याला पुढची वाट दाट धुक्यातून ओलांडावी लागते. याठिकाणाहून अत्यंत रम्य असे निसर्गाचे दर्शन होते . त्याचप्रमाणे मधूनच होणारे सुर्य दर्शन तसेच झाडांवरील दवबिंदू आणि त्यावर पडणाऱ्या सुर्यकिरणांमुळे ते चमकू लागतात. त्याचबरोबर संपूर्ण वनश्रीने नेसलेला हिरवा शालू आपले लक्ष वेधून घेतो, त्यामुळे पूर्णतः निसर्गाच्या कुशीत वसलेले , पवित्र असा अध्यात्मिक वास लाभलेले एक अद्भुत विश्वात घेऊन जाणारे गिरनार अनुभवले कि दत्तात्रयांनी अक्षय निवासासाठी हेच ठिकाण का निवडले याची मनोमन खात्री पटते.
स्थलदर्शन :
- द्वारका
- बेट द्वारका
- नागेश्वर(दारुकावन) (१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक)
- सोरटी सोमनाथ (सौराष्ट्र)(१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक)
- भालका तीर्थ (भगवान श्रीकृष्ण यांनी देह ठेवलेले ठिकाण)
- भवनाथ मंदिर
- त्रिवेणी संगम
- अंबा माता मंदिर (शक्तीपीठ)
- गुरुशिखर गुरुपादुका दर्शन
- कमंडलु कुंड
Day 1
- सकाळी पुणे येथून मुंबईकडे प्रस्थान. मुंबई वरून दुपारी ट्रेनने जुनागडकडे प्रस्थान.
Day 2
- सकाळी जुनागड येथे पोहोचणे.
- फ्रेश होऊन व नाष्टा करून सोरटी सोमनाथ कडे प्रस्थान.
- येताना भालकातीर्थ, गीता मंदिर व त्रिवेणी संगम यांचे दर्शन
- जुनागढ येथे मुक्काम.
- जे पायी गिरनार वर जाणार आहेत त्यांनी रात्रीच चढायला सुरुवात करणे.
Day 3
- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर रोपवे द्वारे गुरुशिखराकडे प्रयाण.
- अंबा माता, गोरक्षनाथ मंदिर यांचे वाटेत दर्शन करणे.
- येताना कमंडलू कुंड चे दर्शन करणे.
- दुपारी रोपवेद्वारे खाली येणे.
- रात्री द्वारकेकडे प्रस्थान.
Day 4
- पहाटे द्वारका येथे पोहोचणे.
- सकाळी नाष्टा आटोपुन बेट द्वारका दर्शनासाठी प्रस्थान.
- रुख्मिणी मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग यांचे दर्शन करणे.
- द्वारका येथे परतणे व मुख्य द्वारकाधीश मंदिराचे दर्शन करणे.
- रात्रीचे जेवणव द्वारका येथे मुक्काम करणे.
Day 5
- सकाळी नाष्टा करून द्वारकेवरून मुंबईकडे प्रस्थान.
Day 6
- पहाटे मुंबई येथे पोहोचणे.
- सकाळी मुंबई वरून पुण्याकडे प्रस्थान.
- सकाळी ९ वाजता पुण्याला पोहोचणे.
यात्रा समाप्त!
Included
- रेल्वे प्रवास ३ टियर AC क्लास
- स्थलदर्शन नॉन एसी बस
- दररोज दोन पाण्याच्या बाटल्या
- दोन वेळचा चहा
- सकाळी नाष्टा
- दोन वेळचे जेवण
- राहण्याची सुविधा (२-३ शेअरिंग बेसिसवर)
- गिरनार रोपवे तिकीट
Excluded
- रेल्वेतील चहा, नाष्टा, जेवण, पाणी
- कोणत्याही ठिकाणचे एन्ट्री तिकीट
गिरनार यात्रेसंदर्भात माहिती
- या यात्रेमध्ये स्त्री व पुरुष दोघांनाही मुक्त प्रवेश आहे.
- आपले ओळखपत्र हे स्वतःसोबत ठेवणे बंधनकारक आहे.
- संपुर्ण प्रवासात फक्त शाकाहारीच जेवण दिले जाईल.
- ज्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात त्यांनी सुकामेवा, बिस्कीट अशे काही पदार्थ स्वतःसोबत बाळ्गावेत, कारण नाष्टा किंवा जेवणाच्या वेळा मागे – पुढे होऊ शकतात.
- बहुतांश ठिकाणी अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअर सारख्या सुविधा उपलब्ध असतीलच असे नाही , त्यामुळे अशा ठिकाणी प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो , या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्याच्या संबंधित सर्व प्रकारचे औषध जवळ बाळगणे आवश्यक आहे.
गिरनारयात्रा नोंदणी संबंधित काही नियमव अटी
- यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर प्रवेश दिला जाईल.
- यात्रेच्या बुकिंग करतेवेळी स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
- आपण बुकिंग दरम्यान फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल. आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी ५००० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे, तसेच उर्वरित रक्कम यात्रेला जाण्याच्या १५ दिवस आधी भरावी लागेल . उर्वरित रक्कम दिलेल्या अवधीत जमा न केल्यास बुकिंग रद्द करण्याचे अधिकार संस्थेला असतील.
- ही रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करूशकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता. (बँक खातेविषयक तपशील खाली दिला आहे.)
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून त्यांना यात्रेला येण्यास शक्य होणार नसल्यास बुकिंग करतेवेळी भरलेली रक्कम रुपये ५००० /- यात्रेकरूंना माघारी मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
- ऐनवेळी महामारी,वादळ,पर्जन्यवृष्टी,पूर,भारतबंद,अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणाने यात्रा रद्द करावी लागल्यास आपल्याला रेल्वेचे तिकीट पण रद्द करावे लागतात. रेल्वेचे तिकीट रद्द केल्यावर त्याची पूर्ण रक्कम आपल्याला परत मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही परीस्थित आपण भरलेली आगाऊ रक्कम आपल्याला परत मिळणार नाही. अशावेळी आपल्याला काही दिवस थांबावे लागेल व त्यानंतर जेव्हा पुन्हा या किंवा अन्य दुसऱ्या यात्रा आयोजित होतात त्यामध्ये आपण सामील होऊ शकता.
- ट्रीपला जाण्याच्या ठिकाणी नैसर्गिक स्थिती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संस्थेला असतील. तारखांमध्ये बदल करण्यात येणार असेल तर त्याची माहिती ५ दिवस आधी प्रवाशांना देण्यात येईल, त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा असेल.
Warning: Undefined array key “fa_class” in /home/u490433738/domains/shreesadgurutours.com/public_html/wp-content/themes/triply/template-parts/booking/single/additional.php on line 17
गिरनार यात्रेसंबंधित काही महत्वाच्या सूचना
- आपण सर्वजण दत्तदर्शनाला जात आहोत. दत्त महाराजांची इच्छा असल्याशिवाय त्यांचे दर्शन करणे शक्य नसते. आपण सर्व जण नशीबवान आहोत म्हणून आपल्या सर्वाना दत्त दर्शनाचा लाभ होणार आहे.
- देवदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, महाराज पावलोपावली आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे देवदर्शन करतेवेळी आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे.
- आपण ज्या ठिकाणी जात आहोत ती अतिशय छोटी खेडेगाव आहेत. तिथे शहरांसारख्या सुखसोयी लवकर उपलब्ध होत नाहीत. महाराजांच्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये ह्याची जबाबदारी महाराजांनी आमच्यावर सोपवली आहे, त्यानुसार त्या लहानश्या खेड्यांमध्येही सुखसोयी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आम्ही करतो. परंतु तरीही अचानक काही अडचणी आल्यास आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा असेल.
- सर्व ठिकाणी गरम पाणी,कमोड व बेड ची व्यवस्था केलेली आहे, परंतु काही वेळा चुलीची लाकडे संपली, लाईट गेली असल्यास गरम पाणी उपलब्ध करणे शक्य होत नाही. अशा अडचणी सहसा येत नाहीत परंतु आल्या तरी त्यावेळी तिथे सामंजस्याने वागावे.
- संपूर्ण प्रवासादरम्यान रेल्वेत अथवा मंदिरात किंवा पर्वतावर किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये. रेल्वेमध्ये बेसिन च्या खाली कचऱ्याचा डब्बा असतो, त्यामध्येच सर्व कचरा टाकावा. चहाचे कप, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, अन्नपदार्थांची रिकामी पाकिटे, प्लास्टिक पिशव्या , प्लेट्स अथवा कुठल्याही प्रकारचा कचरा हा एका पिशवी मध्ये साठवून ती पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकावी.
- प्रवाश्यांचे कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, मित्र, आप्तजन,स्वकिय अथवा ओळखीचे व्यक्ती ; जे आमच्या संस्थेमार्फत ट्रिपला आलेले नाहीत, अश्या कुठल्याही व्यक्तीला रूम्स , रेस्टोरंटस किंवा साईट सिनिंग मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अश्या प्रकारे काही आढळ्यास प्रवाश्याना दंड करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत.
- रेल्वे स्टेशन वर बरेच ठिकाणी हमालाची व्यवस्था असते, पण तरीही त्यानुसार सर्वानी आपल्याला झेपेल एवढेच सामान आणावे. शक्यतो चाकांची बॅग असावी म्हणजे कुठे हमाल मिळाला नाही तर सामान वाहून न्यायला त्रास होणार नाही.
- यात्रेमध्ये सर्वांनाच लोवर बर्थ (रेल्वे मध्ये खालचे सीट ) मिळणे शक्य नाही. शक्य तेवढ्या लवकर बुकिंग केल्यास लोवर बर्थ मिळवणे थोडे सोपे जाते. परंतु तरीही सर्वांनाच लोवर बर्थ मिळेल याची शाश्वती आम्ही देत नाहीत.
- आपण ग्रुप बुकिंग केले असले तरीही सर्वाना एकाच बोगीमध्ये सीट्स मिळतील याची शाश्वती नाही. रेल्वे मध्ये सीट्स निवडता येत नाहीत.
- आमचे स्वयंसेवक हे आपल्यापेक्षा वयाने खुप लहान आहेत परंतु या यात्रांचा अनुभव त्यांना जास्त आहे त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूंनी स्वयंसेवकांच्या सूचना पाळणे व सांगितलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपल्याला काहीही गैरसोय होत असल्यास तसे आपण स्वयंसेवकास सांगू शकता, त्याप्रमाणे आपल्याला मदत केली जाईल . यात्रेमध्ये कोणीही स्वयंसेवकांशी चढ्या आवाजात बोलणे, त्यांच्याशी भांडणे करणे असा व्यवहार करू नये. यात्रेमध्ये कोणीही आपापसात देखील भांडू नये.
- साईट सीइंग च्या वेळी वाहनांमध्ये आळीपाळीने पुढे मागे बसावे. कोणाचीही जागा निश्चित स्वरूपाची नाही. हे सर्वानी आपापसात सामंज्यसाने ठरवावे.
- आपणास कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे परंतु तरीही परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो , या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- आमच्या संस्थेमार्फत आपल्याला साईड पर्स व डोक्यावरची कॅप भेट म्हणून दिली जाते. ज्यामध्ये आपण पाण्याची बाटली , नियमित गोळ्या, मेकअप चे सामान , चष्मा, हातरुमाल, पैसे अश्या वस्तू ठेऊ शकता.
- संपूर्ण यात्रेदरम्यान आपल्याला डोक्यावर टोपी घालणे आवश्यक असते.
- प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे धूम्रपान तसेच नशा करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळ्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार संस्थेला आहेत.
- प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास संस्था त्याला जबाबदार राहणार नाही.प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा वैयक्तिक सल्ला असेल.
- प्रवासादरम्यान तसेच संपूर्ण यात्रेमध्ये आम्ही नियोजित केलेल्या सहलीचे फ़ोटो व व्हिडिओ , संस्था आठवणी साठी संग्रहित करून ठेवते तसेच संस्थेच्या ट्रिपविषयी प्रचार व प्रसारासाठी वापरू शकते. या बद्दल प्रवाशांना काही आक्षेप असल्यास त्याची तशी पूर्व कल्पना आम्हाला देणे.
- यात्रेमध्ये संस्थेने तयार केलेले नियम व शिस्त पाळणे बंधनकारक असेल.