भारत देश हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. नद्या, पर्वत, जंगल, वाळवंट, समुद्र, हिमच्छादित प्रदेश असे भिन्न भिन्न प्रकार आपल्या एकाच देशात बघावयास मिळतात. हे सर्व भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना माता मानले जाते. नद्यांची दैवी प्रभावाची कल्पना जाणीव आपल्या पूर्वसूरींना असल्यामुळे नद्यांबद्दल आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमीत चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा पद्धती रीतीभाती आहेत, अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पॄथ्वीतलावरची एकमेवद्वितिय परंपरा आहे नर्मदा परिक्रमा.