Special Pithapur Yatra
श्रीक्षेत्र पिठापूर पिठीकापुरम या नावानेही ओळखले जाते. आंध्र प्रदेश येथे पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये पिठापूर हे क्षेत्र आहे. पिठापूर या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाची स्थापना झाली आहे. श्रीपादांच्या जन्म ठिकाणी मंदिर आणि पादुका असून त्याठिकाणी नित्य पूजा अर्चा सेवा सुरु आहे. श्रीपादश्रीवल्लभ जन्म ठिकाणाजवळ पादगया हे क्षेत्र आहे. हे तीर्थ म्हणजे तलाव असून तेथेच कुक्कुटेश्वर मंदिर आहे. येथे शंकर पार्वती यांनी कोंबडा कोंबडी रूपाने काही काळ वास केला होता अशी कथा आहे. तसेच पिठापूर च्या आसपास देखील अनेक प्राचीन तसेच पुरातन तीर्थक्षेत्र आहेत. त्याचप्रमाणे येथील मंदिर देखील अतिशय भव्य व कोरीव कामाने संपन्न आहेत.