Mathura, Vrindavan, Gokul Darshan Yatra (including air travel)
श्री सद्गुरू टुर्स अँड ट्रॅव्हल्स, साई विहार सोसायटी, कर्वे नगर, पुणे -५२ / संपर्क - ८९८३१९४१५४ / ९७६७११८८०४
Description
Tour Plan
Included/Excluded
More Information
Description
मथुरा-वृंदावन-गोकुळ दर्शन यात्रा (विमान प्रवासासहित)
- यात्रा दिनांक : ०९ ते १३ डिसेंबर २०२५
- यात्रा शुल्क : ३५,०००/- + ५ % GST विमान प्रवासासहित
- नोंदणीसाठी भरावयाची आगाऊ रक्कम : १५०००/- (non-refundable)
(आपल्याला रेल्वेने प्रवास करायचा असल्यास त्याप्रमाणे व्यवस्था करून देण्यात येईल)
स्थलदर्शन:
- मथुरा
- वृंदावन
- गोकुळ
- गोवर्धन
- नंदगाव
- बरसाना
- आणि आसपासची अनेक मंदिरे
Tour Plan
Day 1 – पुणे/मुंबई ते दिल्ली विमानप्रवास
- पुणे व मुंबई वरुन पहाटे विमानाने दिल्ली कडे प्रस्थान.
- दिल्ली येथे पोहोचल्यावर बसने मथुराकडे प्रस्थान, चेक इन करणे.
- मथुरा येथे दुपारी श्रीकृष्ण जन्मभूमी दर्शन, द्वारकादीश मंदिर दर्शन.
- रात्रीचे जेवण व मथुरा येथे मुक्काम.
- पहिल्या दिवशी दुपारचे व रात्रीचे जेवण देण्यात येईल.
Day 2
- सकाळी नाष्टा करून बसने गोवर्धन परिक्रमा साथी प्रस्थान करणे.
- 21 किमीची परिक्रमा ई-रिक्षाने करणे. (अंदाजे तीन तास)
- परिक्रमा मार्गात चामुंडा देवी, कैलास देवी, श्रीकृष्ण चैतन्य राधा प्रभू, कुसुम सरोवर, अश्या अनेक छोट्या मोठ्या मंदिरांचे दर्शन करणे.
- रात्रीचे जेवण व मथुरा येथे मुक्काम.
Day 3
- सकाळी नाष्टा करून बरसाना कडे प्रस्थान
- बरसाना येथे राधा राणी मंदिर दर्शन.
- नंदगाव, गोकुळधाम दर्शन
- रात्रीचे जेवण व मथुरा येथे मुक्काम.
Day 4
- सकाळी नाष्टा करून वृंदावन कडे प्रस्थान.
- वृंदावन येथे ई-रिक्षाने स्थलदर्शन करणे
- वैष्णोदेवी मंदिर, प्रेम मंदिरं, जुगल किशोर मंदिर, बाके बिहारी मंदिर, सेवा कुंज, सोन्याचा खांब, निधीवन, इस्कॉन मंदिर, रंगजी मंदिर, कोपेश्वर मंदिर आणि इतर मंदिरे..
- वृंदावन येथे दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत सर्व मंदिर बंद असतात.
- संध्याकाळी 4 वाजता यमुना नदी मध्ये बोट प्रवास, बोटमधून जुगल घाट, इमली घाट, श्रीनगर घाट, आरती घाट, केसी घाट, आणि रात्री यमुना आरती पाहणे. (स्वखर्चाने)
- रात्रीचे जेवण व मथुरा येथे मुक्काम.
Day 5
- सकाळी नाष्टा करून दिल्ली विमान तळाकडे प्रस्थान .
- या दिवशी रात्रीचे जेवण देण्यात येणार नाही.
Included/Excluded
Included
- पुणे/मुंबई ते दिल्ली येताना-जाताना विमानप्रवास/रेल्वेप्रवास (नियम व अटी लागू)
- फिरण्यासाठी AC 2X2 पुश बॅक बस
- दोन पाणी बॉटल
- चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण
- राहण्याची सुविधा 2/3 शेअरिंग डिलक्स किंवा तीन तारांकित हॉटेल मध्ये.
- ट्रॅव्हल्स इन्शुरन्स (नियम व अटी लागू)
Excluded
- कोणत्याही ठिकाणचे प्रवेश शुल्क, व्हि.आय.पी दर्शन शुल्क
- स्थानिक ठिकाणे फिरण्यासाठीची वाहने
More Information
यात्रा रद्द करण्याबाबत नियम
- बुकिंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी १५००० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे.
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून यात्रेला येणे रहित झाल्यास कोणत्याही कारणास्तव ऍडव्हान्स भरलेली रक्कम आपल्याला परत मिळणार नाही.
- ऐनवेळी महामारी, वादळ, पर्जन्यवृष्टी, पूर, भारतबंद अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणाने यात्रा रद्द झाल्यास कोणत्याही परीस्थित आपण भरलेली आगाऊ रक्कम आपल्याला परत मिळणार नाही. अशावेळी आपण त्या नंतर यात्रा आयोजित केल्यावर त्यामध्ये सामील होऊ शकता. यामध्ये रेल्वेचे/विमानाचे तिकीट रद्द करून परत मिळणारी रक्कम पुढील यात्रेत ग्राह्य धरली जाईल.
- उर्वरित रक्कम यात्रेच्या १५ दिवस आधी भरणे आवश्यक आहे.
नोंदणी रद्द करण्याबाबतचा तक्ता :
दिवस | भरलेली रक्कम | परत मिळणारी रक्कम |
---|---|---|
नोंदणी करतेवेळी भरलेली रक्कम | 15000/- | कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. |
यात्रेला जाण्याच्या 11 ते 15 दिवस आधी | ३६७५०/- | १६३१२/- |
यात्रेला जाण्याच्या 5 ते 10 दिवस आधी | ३६७५०/- | १०८७५/- |
यात्रेला जाण्याच्या 2 ते 4 दिवस आधी | ३६७५०/- | २१७५/- |
यात्रेला जाण्याच्या 1 दिवस आधी | ३६७५०/- | ०/- |
यात्रेला सोबत आणावयाच्या आवश्यक गोष्टी
- यात्रेदरम्यान आपले ओळखपत्र (जसे कि आधारकार्ड, ड्रायविंग लायसेन्स किंवा मतदान कार्ड यापैकी कोणताही एक) सोबत बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
- खाऊ : यात्रेमध्ये नाष्ट्याच्या / जेवणाच्या वेळा मागेपुढे होऊ शकतात, त्यासाठी आपण घरूनच काही खाऊ (जसे कि चिवडा, लाडू, खाकरा, चकली, शेव) घेऊन यावा. जेणेकरून आपल्यापैकी बऱ्याच जणांना सकाळी गोळ्या घ्याव्या लागतात त्यांना थोडं खाऊन गोळ्या घेता येतात.
- औषधे : आपली रोजची बिपी / शुगर किंवा आपल्याला लागणारी नियमित औषधे न विसरता पिशवीत ठेवावे. त्याबरोबरच डोकेदुखी, ताप, सर्दी, पित्त, अंगदुखी अशी काही किरकोळ औषधे पण सोबत असू द्यावीत. ज्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखीचा त्रास आहे त्यांनी कंबरपट्टा, मानेंचा पट्टा, नीकॅप आठवणीने आणावे.
- शक्यतो सामानासाठी चाकाची बॅग आणावी जेणेकरून आपल्याला सामान वाहून न्यायला अवघड जाणार नाही.
- आपण सीतामढी शक्तीपीठांचे दर्शन घेणार आहोत, आपल्या इच्छेनुसार आपण ओटीचे सामान आणू शकता.
- ज्यांचे 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे त्या यात्रेकरूंना डॉक्टरकडून फिटनेस सर्टिफिकेट आणणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या सूचना
- आपण सर्वजण देव दर्शनाला जात आहोत. देवाची इच्छा असल्याशिवाय त्यांचे दर्शन करणे शक्य नसते. आपण सर्व जण नशीबवान आहोत म्हणून आपल्या सर्वाना दर्शनाचा लाभ होणार आहे.
- देवदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, महाराज पावलोपावली आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे देवदर्शन करतेवेळी आपण मनाने अतिशय स्थिर व प्रसन्न असणे आवश्यक आहे.
- यात्रेमध्ये आपल्याला दररोज पहाटे उठावे लागते.
- विमान तळावर आपले सामान आपल्यालाच वाहून न्यावे लागेल, त्यानुसार सर्वानी आपल्याला झेपेल एवढेच सामान आणावे. त्यामुळे शक्यतो चाकांची बॅग असावी म्हणजे आपल्याला सामान वाहून न्यायला त्रास होणार नाही.
- आपण विमान तिकीट काढण्याआधी जर तिकीटांचे रेट्स वाढले तर आपल्याला वाढलेल्या रक्कमेप्रमाणे वाढीव रक्कम भरावी लागेल.
- कधी कधी विमान प्रवास कंपन्या अचानक विमान रद्द करतात अश्यावेळी आपल्याला पुन्हा दुसरे विमान तिकीट काढावे लागतात. त्यावेळी जर नवीन विमान तिकीटांसाठी काही अतिरिक्त खर्च आला तर त्याचे वाढीव शुल्क आपल्याला द्यावे लागतील.
- यात्रा कालावधीपेक्षा जास्त दिवस आपल्याला राहायचे असल्यास त्याचे अतिरिक्त शुल्क आपल्याला द्यावे लागेल.
- प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास श्री सद्गुरू टूर्स त्याला जबाबदार राहणार नाही. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा वैयक्तिक सल्ला असेल.
- यात्रेमध्ये संस्थेने तयार केलेले नियम व शिस्त पाळणे बंधनकारक असेल.
- प्रवासादरम्यान संस्थेने नेमून दिलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरूंनी पाळणे बंधनकारक असेल.
- आमचे स्वयंसेवक हे आपल्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत परंतु या यात्रांचा अनुभव त्यांना जास्त आहे, त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूंनी स्वयंसेवकांच्या सूचना पाळणे व सांगितलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपल्याला काहीही गैरसोय होत असल्यास तसे आपण स्वयंसेवकास सांगू शकता, त्याप्रमाणे आपल्याला मदत केली जाईल. यात्रेमध्ये कोणीही स्वयंसेवकांशी चढ्या आवाजात बोलणे, त्यांच्याशी भांडणे करणे असा व्यवहार करू नये. यात्रेमध्ये कोणीही आपापसात देखील भांडू नये.
- साईट सीइंगच्या वेळी वाहनांमध्ये आळीपाळीने पुढे मागे बसावे. कोणाचीही जागा निश्चित स्वरूपाची नाही. हे सर्वानी आपापसात सामंजस्याने ठरवावे.
- आपणास कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे, परंतु तरीही परिस्थितीनुसार कार्यक्रमांच्या रूपरेषेत बदल होऊ शकतो. या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- संपूर्ण प्रवासादरम्यान मंदिरात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये.
- आमच्या संस्थेमार्फत आपल्याला साईड पर्स व डोक्यावरची कॅप भेट म्हणून दिली जाते. ज्यामध्ये आपण पाण्याची बाटली, नियमित गोळ्या, मेकअपचे सामान, चष्मा, हातरुमाल, पैसे अश्या वस्तू ठेऊ शकता. संपूर्ण यात्रेदरम्यान आपल्याला डोक्यावर टोपी घालणे आवश्यक असते.
- ज्यांचे 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे त्या यात्रेकरूंना एमबीबीएस डॉक्टर कडून फिटनेस सर्टिफिकेट आणणे आवश्यक आहे.
यात्रा नोंदणीकरिता
- यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर प्रवेश दिला जाईल.
- यात्रेला जाण्याच्या दहा दिवस आधी स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
- आपण बुकिंग दरम्यान फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल. आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- बुकिंग करतेवेळी आधार कार्ड व एक फोटो आवश्यक आहे. या दोन्हीचे फोटो आपण WhatsApp अथवा Email द्वारेही पाठवू शकता. नोंदणीकरिता यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी १५००० रुपये रक्कम भरणे आवश्यक आहे. आपले यात्रेला येणे रहित झाल्यास कोणत्याही कारणास्तव ही रक्कम आपल्याला परत मिळणार नाही.
- उर्वरित रक्कम यात्रेला जाण्याच्या १५ दिवस आधी भरावी लागेल. उर्वरित रक्कम दिलेल्या अवधीत जमा न केल्यास बुकिंग रद्द करण्याचे अधिकार संस्थेला असतील.
- ही रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता. (बँकेचा तपशील खाली नमूद केला आहे.)
- ऐनवेळी महामारी, वादळ, पर्जन्यवृष्टी, पूर, भारतबंद अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणाने यात्रा रद्द झाल्यास कोणत्याही परिस्थितीत आपण भरलेली आगाऊ रक्कम आपल्याला परत मिळणार नाही. अशावेळी आपण त्या नंतर यात्रा आयोजित केल्यावर त्यामध्ये सामील होऊ शकता.