Narmada Parikrama
नर्मदे हर !!! नर्मदे हर !!! नर्मदे हर !!!
भारत देश हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. नद्या, पर्वत, जंगल, वाळवंट, समुद्र, हिमच्छादित प्रदेश असे भिन्न भिन्न प्रकार आपल्या एकाच देशात बघावयास मिळतात. हे सर्व भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना माता मानले जाते. नद्यांची दैवी प्रभावाची कल्पना जाणीव आपल्या पूर्वसूरींना असल्यामुळे नद्यांबद्दल आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमीत चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा पद्धती रीतीभाती आहेत, अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पॄथ्वीतलावरची एकमेवद्वितिय परंपरा आहे नर्मदा परिक्रमा.
भारतामध्ये नर्मदा नदीपेक्षाही अनेक मोठ्या नद्या आहेत परंतु परिक्रमा केवल नर्मदेचीच केली जाते. नर्मदा परिक्रमा ही सर्वप्रथम श्री मार्कंडेय मुनी यानी केली,त्यांना शास्त्रोक्त महापरिक्रमेला जवळजवळ २७ वर्ष लागली.
नर्मदा परिक्रमा कुणी, का, कोणत्या वयात, कशी नी कश्यासाठी करावी ?… नर्मदा परिक्रमा कुणीही करावी, इथे जन्म, जात, वंश, जाती, धर्म, लिंगभेद, वय यांची अजिबात अडकाठी नाही. नर्मदा परिक्रमा हे मानवी मनाच्या सबलीकरणाच, निर्मलीकरणाच साधण आहे. आपल्या स्वत:शिवाय दुसऱ्या कुणाच्याच हातात हे नाही. दुसऱ्याचे अनुभव वाचून किंवा ऎकून ते उमगलं कळलं तरी त्याची अनुभूती स्वत:ची स्वत:च घेणं केव्हाही उत्तम, त्यामुळे नर्मदा परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला काहिच हरकत नाही.
पायी नर्मदा परिक्रमा ही चार्तुमास पाळून साधारण ३ वर्ष ३ महिने १३ दिवसात पूर्ण होते. ज्यांना शारिरीकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा शक्य नाही अश्यांनी २ ते ३ आठवड्याच्या कालावधीत वाहनाद्वारे परिक्रमा पूर्ण केली तरीसुद्धा चालते. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे नी श्रद्धेने करणे अगत्याचे आहे. ही परिक्रमा म्हणजेच शारिरीक, मानसिक व अध्यात्मिक तप आहे. नर्मदा परिक्रमा ही जवळ जवळ ३५०० किलोमीटर आहे. सर्व नद्यांमध्ये गंगा नदी श्रेष्ट असली तरी परिक्रमा फक्त नर्मदेचीच केली जाते.
Day 1
- मुंबई/पुण्यावरून इंदोर पर्यंत AC रेल्वे अथवा बस प्रवास
- ओंकारेश्वर येथे संकल्प करुन AC बसद्वारे परिक्रमा सुरु होईल.
- उज्जैन वरून मुंबई/पुण्यापर्यंत रेल्वे प्रवास
Day 2
- पुणे/मुंबई येथून इंदोर कडे प्रस्थान.
Day 3
- इंदोर येथे पोहोचणे व ओंकारेश्वरकडे प्रस्थान. ओंकारेश्वर येथे मुक्काम.
Day 4
- ओंकारेश्वर येथे ममलेश्वराचे दर्शन करने. नर्मदा परिक्रमा संकल्प करून, परिक्रमा उचलणे. व कन्यापूजन व कढाई प्रसादाचे वाटप करून परिक्रमा प्रारंभ.
- लेपा येथील भारती ठाकूर यांचा प्रकल्प बघून, रावेरखेडी येथील बाजीराव पेशवे यांच्या समाधीचे दर्शन व बडवाणी येथे मुक्काम.
Day 5
- प्रकाशा येथील दक्षिण काशी क्षेत्राचे दर्शन व मुक्काम.
Day 6
- शूलपानेश्वराचे दर्शन व कुंभेश्वर दर्शन, भालोद दर्शन व मुक्काम.
Day 7
- विमलेश्वर, बुलबुलकुंड ह्या स्थळांचे दर्शन घेऊन कटपूर येथील समुद्राकडे प्रस्थान. भरतीच्या वेळा बघून समुद्रातून बोटीमार्गे मिठीतलाई येथे पोहोचणे. (समुद्र प्रवास ५ तासांचा असेल.)
Day 8
- नारेश्वर येथे रंगावधूत स्वामींचे दर्शन करून नारेश्वर येथे मुक्काम.
Day 9
- कुबेर भंडारी दर्शन व गरुडेश्वर येथे टेंभे स्वामींच्या मंदिरात दर्शन करून गरुडेश्वर येथे मुक्काम.
Day 10
- गरुडेश्वर वरून महेश्वर कडे प्रस्थान व महेश्वर येथे मुक्काम.
Day 11
- मंडलेश्वर येथे दर्शन करून नेमावर येथे मुक्काम. नेमावर हे मैयाचे नाभीस्थान आहे, येथे आपण मैयाची ओटी भरू शकता.
Day 12
- ग्वारीघाट, भेडाघाट दर्शन करून जबलपूर येथे मुक्काम.
Day 13
- अमरकंटक कडे प्रस्थान व मुक्काम. अमरकंटक हे नर्मदा मैयाचे उगमस्थान आहे.
Day 14
- दिंडोरी मार्गे लेखनादिन येथे पोहोचणे. महाराजपूर येथे मुक्काम.
Day 15
- हौशंगाबाद कडे प्रस्थान व मुक्काम.
Day 16
- हरदा, खांडवा मार्गे ओंकारेश्वर येथे परतणे. ओंकारेश्वर येथे संकल्पपूर्ती, कोटी लिंगार्चन व पापनाशन पूजा व मुक्काम.
Day 17
- ओंकारेश्वर वरून उज्जैन कडे प्रस्थान. उज्जैन येथे महाकालेश्वर, काळभैरवनाथ दर्शन व उज्जैन येथे मुक्काम.
Day 18
- उज्जैन येथून दुपारी पुणे कडे प्रस्थान.
Day 19
- पुणे येथे पोहोचणे.
Day 20
- एक दिवस समुद्राप्रवासा साठी राखीव ठेवलेला असतो.
Included
- सर्व प्रवास खर्च : पुणे ते पुणे रेल्वे तिकीट, इंदोर ते इंदोर एसी बसने प्रवास
- दररोज दोन पाण्याची बाटल्या
- दोन वेळचा चहा, कॉफी
- सकाळी नाष्टा
- दोन वेळचे जेवण (कांदा लसूण विरहीत)
- राहण्याची सुविधा स्वच्छ व नीटनेटक्या हॉटेल मध्ये २/३ शेरिंग बसिस वर.
- दोन ठिकाणी एकत्रित पद्धतीने मुक्काम
- समुद्र प्रवासाचे बोट तिकीट
Excluded
- रेल्वेमधील चहा, नाष्टा, जेवण, पाण्याचा खर्च वैयक्तिक असेल
- संकल्प पूजा, संकल्पपूर्ती पूजा, पापनाशन पूजा या पुजेची दक्षिणा
- कन्यापूजन
- अमरकंटक येथे छोट्या गाड्यामधून स्थलदर्शन करावे लागते, त्याचे शुल्क.
परिक्रमा स्वरुप
- नर्मदा परिक्रमा करताना आपल्या उजव्या हाताला नर्मदा ठेऊन परिक्रमा करायची असते.
- परिक्रमेत कोठेही मैयाला ओलांडून जायचे नसते.
- नर्मदा हि कन्या स्वरुपात असल्यामुळे या यात्रेत कन्या पूजनाला अनन्य साधारण महत्व आहे.
- नर्मदा मैयाची परिक्रमा हि ओंकारेश्वर येथे संकल्प करून, कढाईच्या प्रसादाने सुरु होईल. ओंकारेश्वर येथून ब्राह्मणाद्वारे अभिषेक करून नर्मदेचे पाणी एका बाटलीत किंवा कॅन मध्ये भरून घेणे व परिक्रमा पूर्ण झाल्यावर त्याच पाण्याने संकल्प पूर्ण करणे.
- नर्मदा परिक्रमा ही जवळ जवळ ३५०० किलोमीटर आहे.
- परिक्रमा हि AC बसने असेल . बसमध्ये रोटेशन पद्धतीने बसण्याची व्यवस्था असेल.
- जरी हि परिक्रमा बसने असली तरीही पायी परीक्रमेचे सर्व नियम पाळले जातील.
- हि यात्रा पूर्णपणे धार्मिक असल्यामुळे, दररोज सकाळी व संध्याकाळी देवाचे नामस्मरण , नर्मदाष्टक , नर्मदा आरती , भजन केले जाईल.
- यात्रेदरम्यान शाकाहारी व सात्विक आहारच दिला जाईल. (जेवणात कांदा व लसूण यांचा वापर होणार नाही)
- परिक्रमा दररोज सकाळी लवकर सुरु होईल व रात्री मुक्काम केला जाईल. कोठेही रात्रीचा प्रवास नसेल. फक्त कटपूर येथे भरतीच्या वेळा पाहून रात्रीच्या वेळी समुद्र प्रवास असू शकतो. समुद्र प्रवास करताना जीव रक्षक कवच (Life Jacket)देण्यात येईल.
- परिक्रमेदरम्यान कोणत्याही प्रकारचे व्यसन, धूम्रपान करणे वर्ज असेल.
- परिक्रमे दरम्यान मुख्य उपवास असल्यास त्यानुसार उपवासासाठी फळे, खिचडी, भगर , उपवासाचे पदार्थ उपलब्ध करून दिले जातील, परंतु आपल्या वैयक्तिक उपासाच्या वेळी मात्र प्रत्येक वेळी व्यवस्था होईलच असे नाही, त्यावेळी आपल्याला फळे उपलब्ध करून देण्यात येतील.
काही नियम व अटी
- यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर प्रवेश दिला जाईल.
- यात्रेच्या बुकिंग करतेवेळी स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
- आपण बुकिंग दरम्यान फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल. आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
- यात्रेच्या नोंदणी करिता यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी १०,०००/- रुपये एवढी रक्कम भरणे आवश्यक आहे व उर्वरित रक्कम यात्रेला जाण्याच्या १५ दिवस आधी भरावी लागेल. उर्वरित रक्कम दिलेल्या अवधीत जमा न केल्यास बुकिंग रद्द करण्याचे अधिकार संस्थेला असतील.
- हि रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता. (बँक खातेविषयक तपशील खाली दिला आहे.)
- यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून त्यांना यात्रेला येण्यास शक्य होणार नसल्यास बुकिंग करतेवेळी भरलेली 10000 रुपये रक्कम यात्रेकरूंना माघारी मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
- बहुतांश ठिकाणी अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअर सारख्या सुविधा उपलब्ध असतीलच असे नाही, त्यामुळे अशा ठिकाणी प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो, या बाबत कोणीही तक्रार करू नये.
- ट्रीपला जाण्याच्या ठिकाणी नैसर्गिक स्थिती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संस्थेला असतील. तारखांमध्ये बदल करण्यात येणार असेल तर त्याची माहिती १५ दिवस आधी प्रवाशांना देण्यात येईल, त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा असेल.
- महामारी, चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर, भारतबंद अथवा कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणास्तव यात्रा रद्द करावी लागल्यास झालेला खर्च वजा करूनच आपली रक्कम परत करण्यात येईल.
- जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्याच्या संबंधित सर्व प्रकारचे औषध जवळ बाळगणे आवश्यक आहे.
परिक्रमा दरम्यानच्या महत्वाच्या सूचना
- या यात्रेमध्ये स्त्री व पुरुष दोघांनाही मुक्त प्रवेश आहे.
- आपले ओळखपत्र हे स्वतःसोबत ठेवणे बंधनकारक आहे.
- संपूर्ण प्रवासादरम्यान रेल्वेत अथवा मंदिरात अथवा जंगलात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये. चहाचे कप, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, अन्नपदार्थांची रिकामी पाकिटे, प्लास्टिक पिशव्या, प्लेट्स अथवा कुठल्याही प्रकारचा कचरा हा एका पिशवी मध्ये साठवून ती पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकावी, कोणत्याही व्यक्तीने अश्या प्रकारचा कचरा खिडकीतून किंवा कुठेही रस्त्यावर वर टाकल्यास आढळ्यास त्या व्यक्तीस १०० रु. दंड करण्यात येईल.
- आपण सर्व जण धार्मिक यात्रेला जात असून आपल्या हातून कुठल्याही प्रकारचे कुकर्म होणार नाही याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी. प्रदूषण करणे हे देखील कुकर्म करण्यासारखेच आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवासादरम्यान आपल्या हातून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावी.
- परिक्रमेमध्ये सहभागी होण्याची वैयक्तिक जबाबदारी प्रत्येकाची राहील. याचा विचार करूनच या परिक्रमेत सहभागी व्हा.आपल्या कुटुंबियांना पूर्ण कल्पना देऊनच सहभागी व्हा.
- प्रवाश्यांचे कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, मित्र, आप्तजन, स्वकिय अथवा ओळखीचे व्यक्ती; जे आमच्या संस्थेमार्फत परिक्रमेला आलेले नाहीत, अश्या कुठल्याही व्यक्तीला निवासस्थानी, रेस्टोरंटस किंवा साईट सिनिंग मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अश्या प्रकारे काही आढळ्यास प्रवाश्याना दंड करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत.
- प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे धूम्रपान तसेच नशा करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळ्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार संस्थेला आहेत.
- प्रवासादरम्यान आपल्या सर्व वस्तूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास संस्था त्याला जबाबदार राहणार नाही.
- यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारच्या राजकीय, भौतिक तसेच घरगुती विषयांवरील चर्चा कटाक्षाने टाळाव्यात.
- प्रवासादरम्यान तसेच संपूर्ण यात्रेमध्ये आम्ही नियोजित केलेल्या सहलीचे फ़ोटो व व्हिडिओ, संस्था आठवणी साठी संग्रहित करून ठेवते तसेच संस्थेच्या ट्रिपविषयी प्रचार व प्रसारासाठी वापरू शकते. या बद्दल प्रवाशांना काही आक्षेप असल्यास त्याची तशी पूर्व कल्पना आम्हाला देणे.
- प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा वैयक्तिक सल्ला असेल.
- आपल्याला परिक्रमेसंबंधी ज्या काही सूचना करायच्या असतील त्या परिक्रमा संपल्यावर लेखी स्वरूपात कराव्यात. तेथील पवित्र आणि मंगल परिसरात आयोजक आणि इतर कोणाबरोबर कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये.
- यात्रेमध्ये संस्थेने तयार केलेले नियम व शिस्त पाळणे बंधनकारक असेल.
- प्रवासादरम्यान संस्थेने नेमून दिलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरूंनी पाळणे बंधनकारक असेल.
- नर्मदा परीक्रमा हा एक दैवी आध्यात्मिक अनुभव असल्याने ज्यांना पुरेसा वेळ काढता येईल, त्यांनीच सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती भाविकांना आहे
- नर्मदा परिक्रमा हि कोणतीही पिकनिक किंवा ट्रेकिंग नाही. हि १००% धार्मिक यात्रा आहे.
Warning: Undefined array key “fa_class” in /home/u490433738/domains/shreesadgurutours.com/public_html/wp-content/themes/triply/template-parts/booking/single/additional.php on line 17
परिक्रमेदरम्यान सोबत बाळगण्याच्या आवश्यक गोष्टी
- दररोज लागणारी महत्वाची औषधे.
- शुगर असल्यास शुगर चेक करण्याची मशीन.
- ३ टॉवेल.
- मास्क, Sanitizer
- मुखवास, लवंग, बडीशोप, खडीसाखर इ.
- बेडशीट , पांघरण्यासाठी शाल किंवा लाईट वेट ब्लॅंकेट.
- स्वेटर, कानटोपी, छत्री.
- आपल्या श्रद्धेनुसार पूजेसाठी लागणारे सामान. उदा. फुलवाती, अगरबत्ती, हळद, कुंकू इ.
- नर्मदा परिक्रमेदरम्यान फक्त पांढरे वस्त्र किंवा फिकट रंगाचे कपडेच परिधान करावे.
- ज्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखीचा त्रास आहे अश्यानी कंबरपट्टा, मानेंचापट्टा, नीकॅप आठवणीने आणावे.
- सर्वानी आपल्यासोबत एक छोटा बॉक्स ठेवावा,त्यामध्ये आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सल्यानुसार ताप, थंडी, डोकेदुखी, पित्त, अंगदुखी, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या यावर उपयुक्त अश्या गोळ्या ठेवाव्यात. तसेच इलेक्ट्राल पावडर चे २-३ पॅक ठेवावे. वेदनांवर लावण्यासाठी मलम, वेदनाशामक स्प्रे, बँड-एड, कापूस, हँडसॅनिटायझर, पेपर सोप, टिशूंपेपर ठेवावे.
- शक्यतो १ ट्रॉली बॅग व हॅन्डबॅग मध्येच सामान आणावे.
- परिक्रमा करतेवेळी कन्यापूजन केले जाते, नर्मदा परिक्रमेत कन्यापूजनाचे खूप महत्व आहे. कन्यापूजनासाठी ९ वर्षापर्यंत च्या मुलींसाठी आपल्या इच्छेनुसार आपण काही आणू इच्छित असाल तर जरूर आणावे.
- समुद्र पार करतेवेळी नाविकाला आपल्या श्रद्धेनुसार धोतर, शर्ट, श्रीफळ, शाल आपण देऊ शकता.
- नर्मदा मैयाची ओटी भरण्याचे ३ ठिकाण आहे, आपल्या इच्छेनुसार आपण ओटीचे साहित्य आणू शकता.
नोट: परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो, या बाबत सहकार्याची अपेक्षा आहे तसेच कोणीही तक्रार करू नये.
*त्वदीयपाद पंकजं नमामी देवी नर्मदे !*